आमदार डॉ.अशोकराव माने (बापू) यांचा ७१ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा
पेठ वडगांव : हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू) यांचा ७१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करणेत आला. विविध क्षेत्रातील मान्यवर, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिष्ठीत नागरिक यांचेकडून आमदार डॉ. अशोकराव माने यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
अगदी अल्प कालावधीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यसम्राट आमदार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांचा ७१ वा वाढदिवस आज अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहाने साजरा करणेत आला. आपल्या संपूर्ण आयुष्यात अपंग, दलित, बहुजन समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्य करणारे सर्वाना बापू म्हणून परिचित असणारे अशा सामान्यांतील असामान्य व्यक्तीमत्वाचा वाढदिवस त्यांचे सहकारी व कार्यकत्यांकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शिरोळ येथे माने कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. हातकणंगले व वडगाव शहरांमध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. तसेच, सुशांत वड्ड सरपंच अतिग्रे व रुईचे अवधुत पाटील-कुलकर्णी यांनी आमदार महोदयांच्या वजना इतक्या वह्या वहीतुला करून भेट दिल्या, धाराऊ गो-शाळा यळगुड यांना बापूंच्या ७१ व्या वाढदिवसाचे निमित्ताने ७१ किलो गुळाचे वाटप केले. रुई व अतिग्रे येथे राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विनोद बुबनाळे व वृषभ कांबळे यांचेहस्ते ७०० पावसाळी छत्रीचे वाटप करण्यात आले. अनाथाश्रमामध्ये धान्य वाटप केले. आमदार महोदयांनी शिरोळ येथील निवासस्थानी त्यानंतर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणी तमदलगे, पेठ वडगाव येथील जनसंपर्क कार्यालय येथे उपस्थित राहुन शुभेच्छा स्विकारल्या.
यावेळी दलितमित्र आमदार डॉ. अशोकराव माने यांना विधानपरिषद सभापती मा. प्रा. राम शिंदेसाहेब, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसनजी मुश्रीफ, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री ना. भरतशेठ गोगावले, हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशीलदादा माने, मा. मंत्री आमदार विनरावजी कोरे सावकर, माजी मंत्री प्रकाशजी आवाडे यांनी दूरध्वनीव्दारे शुभेच्छा दिल्या. आमदार राहुलजी आवाडे, गोकुळचे मा. अध्यक्ष अरूणजी डोंगळे, दत्त साखर चे चेअरमन गणपतराव पाटील, के.डी.सी.सी बँक संचालक विजयसिंहभैया माने, शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह भिमबहाद्दर माने-पाटील, कुरुंदवाडचे मा. नगराध्यक्ष रामचंद्र (तात्या) डांगे, मा. नगराध्यक्ष मोहनलाल माळी, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, पोलीस निरीक्षक शिरोली सुनिल गायकवाड, माजी सभापती राजेश पाटील, डॉ. प्रदिप पाटील, नवमहाराष्ट्र चेअरमन राजू मगदूम, जवाहर साखरचे व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, संचालक अभय काश्मिरे, आदगोंडा पाटील, पंचगंगा साखरचे मा. संचालक जयपालआण्णा कुंभोजे, मा.जि.प.सदस्य प्रसादभाऊ खोबरे, बबलु मकानदार, भाजपा तालुकाप्रमुख अमरसिंह पाटील, पै. प्रमोद बोरगे, वारणा साखरचे संचालक सुभाषमामा पाटील, उदयसिंह पाटील, वारणा दुध चे संचालक राजवर्धन मोहिते, युवकक्रांती महाआघाडी चे नेते रंगराव बावडेकर, मिरजचे युवा नेते अमित कदम, अजय थोरात, नगरसेवक जवाहर सलगर, गुरुप्रसाद यादव, संतोष लडगे, अमोल हुक्कीरे, डॉ. अभय यादव, दिनेश सनगर, मोहन शिंदे, जेष्ठ नेते बाबासाहेब मोरे, युवानेते अमित गाठ, किरण इंगवले, राजू इंगवले, बजरंग खामकर, शरद उर्फ बापू मोरे, मयूर कोळी, उमेश सुर्यवंशी, मधुकर (बापू) मुसळे, खंडेराव जगदाळे, सोनाली उद्योग समुहाचे संदीप कारंडे, उद्योगपती आदित्य सुर्यवंशी, डेबॉन्स उद्योक समुहाचे भांदिगरे, राजू हुपरे, किशोर जामदार, विरकुमार शेंडुरे, शरद बेनाडे, गुरूकुल शिक्षण समुह चेअरमन घोगरे सर, पट्टणकोडोली सरपंच अमोल बाणदार, महेश नाझरे, सैनिक कल्याण मंडळ जिल्हा पदाधिकारी यासह हातकणंगले व शिरोळ तालक्यातील हजारो कार्यकत्यांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.