भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचा सी पी आर प्रशासनास आंदोलनाचा इशारा

    Advertisements

    भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचा सी पी आर प्रशासनास आंदोलनाचा इशारा

    Advertisements

     

    कोल्हापूर :-  छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील CPR गैरसोय विविध तक्रारीबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने सीपीआरचे अधिष्ठाता यांना भेटून निवेदन दिले व निवेदनातील मुद्द्यांच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत आव्हान केले अन्यथा संघटना या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला .
    निवेदनामध्ये सीपीआर मधील ओपीडी वेळेत सुरू होत नाही व विभाग प्रमुख वेळेत उपस्थित नसतात, रक्त तपासणी व इतर तपासणीसाठी रुग्णांना खाजगी लॅबकडे पाठवले जाते, खाजगी लॅबच्या प्रतिनिधींना प्रवेश निषिद्ध असताना खाजगी लॅब चे प्रतिनिधी रुग्णालयात येऊन रक्ताचे नमुने संकलीत करतात, नर्सिंग साठी प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी राहण्याच्या हॉस्टेलमध्ये बऱ्याच गैरसोयी असून संबंधित पालकांच्या याबाबत तक्रारींची दखल घेतली जात नाही, सध्या सुरू असणाऱ्या रुग्णालयातील सर्व बांधकाम दुरुस्ती कामाची प्रत निकृष्ट असून संबंधितांना याबाबत तात्काळ सूचना करून सुधारणा करण्यात याव्यात तसेच रुग्णालयातील दोष दुरुस्ती मध्ये निघालेला स्क्रॅप व इतर स्क्रॅप यांची टेंडर प्रोसेस होण्याअगोदरच परस्पर विक्री झाल्याचे चर्चा असून मागील तीन महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा पद्धतीच्या मागण्या संघटने कडून करण्यात आल्या अन्यथा या विरोधात दि. 03/06/2025 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून लक्षणीक उपोषण व धरणे आंदोलन सुरू करेल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.
    यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष उत्तमराव पोवार, महेश देसाई, लियाकत खतीब,गोविंद आवळे,नेताजी कांबळे,सुखदेव शेटे,बजरंग बोडके,रूपाली बोडके,परशुराम पाटील इत्यादी सह पदाधिकारी उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements