जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची निलेवाडीस भेट
नवे पारगाव : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निलेवाडीस भेट दिली व ग्रामस्थांच्या सोबत संभाव्य पूर परिस्थिती संदर्भात चर्चा केली. तसेच पूर परिस्थिती निर्माण झाली तर कोणत्या उपाययोजना करायचा याबाबत चर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले, तहसीलदार सुशील कुमार वेल्हेकर गटविकास अधिकारी शबाना मोकाशी , जिल्हा प्रतिनिवारन अधिकारी प्रसाद संकपाळ, निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण, तालुका कृषी अधिकारी अभिजीत गडदे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दातार व सर्व विभागाचे खाते प्रमुख हजर होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच माणिक घाटगे यांनी गुलाबाचे रोप देऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार केला. यावेळी सुरुवातीला जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायतीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या सोबत उपस्थितीमध्ये संभाजी पूर परिस्थिती निर्माण झाली तर कोणत्या उपाययोजना करायच्या या संदर्भात चर्चा केली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना कामासंदर्भात सूचना केल्या. त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने निलेवाडीच पुनर्वसन करावे व संभाव्य पूर परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी निलेवाडी चिकुर्डे पूल रस्ता व्हावा व त्याच्यावर चिकुर्डे पुलाजवळ उड्डाणपूल व्हावे अशा मागण्या केल्या गेल्या सदर मागण्यांच्या बाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी पुराच्या वेळी निलेवाडी चा संपर्क तुटणाऱ्या निलेवाडी ऐतवडे खुर्द पूल तसेच निलेवाडी चिकुर्डे पूल रस्ता तसेच संभाव्य पूर परिस्थितीत अमृत नगर येथील वारणा दूध संघाच्या मालकीच्या जनावरांच्या साठी असलेले निवारा शेड पूरग्रस्तांच्यासाठीचे असलेले निवारा छावणी विलासराव कोरे इंटरनॅशनल स्कूल अमृतनगर या ठिकाणी भेटी दिल्या व आढावा घेतला. तसेच ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय येणार असल्याचे सांगितले.
या यावेळी सरपंच माणिक घाटगे उपसरपंच शहाजी बोरगे कृषी उत्पन्न बाजार समिती वडगावचे संचालक सुभाष भापकर ग्रामपंचायत सदस्य अमर घाटगे, बबन टोपुगडे,राणी कोरे, स्वाती जाधव, शारदा शिंदे, तेजश्री खोत, दीपक शिंदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाजीराव शेळके , मंडल अधिकारी अमित लाड, ग्रामसेविका अनुपम सिद्धनाळे, तलाठी शैलेश कुइंगडे व ग्रामस्थ उपस्थित होते.