Home Breaking News शिंपे गावातील 30 एकर जमिनीतील वनसंपदा कत्तल

शिंपे गावातील 30 एकर जमिनीतील वनसंपदा कत्तल

Advertisements

शिंपे गावातील 30 एकर जमिनीतील वनसंपदा कत्तल

Advertisements

 

 

कोल्हापूर, (अविनाश शेलार यांजकडून):- भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यातर्फे झाडे जगवा झाडे वाचवा तसेच ग्लोबल वॉर्मिंग मनुष्यहानी न करण्यासाठी सध्याचे 40 डिग्री वातावरण थंड करण्यासाठी झाडे लावलीच पाहिजेत यासाठी शतकोटी योजना आणलेली आहे ग्रामपंचायत आणि शहरातील महापालिका यांना सक्तीच्या सूचना देऊन वृक्षसंपदा जतन करणे एकमेव पर्याय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत देशातील 34 लाख खेड्यामध्ये दिलेला आहे परंतु कोल्हापुरातील शिंपे तालुका शाहूवाडी या गावात वनसंपदा नष्ट करणारे सर्वात मोठी घटना घडली आहे

शिंपे हे गाव दुर्गम शाहुवाडी तालुक्यातील आहे सरपंच व उपसरपंच सर्व सदस्य यांनी कोणतीही ग्रामसभा न घेता किंवा गावातील संस्थेने न कळवता जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख आणि वनसंरक्षक जिल्हाप्रमुख कोल्हापूर यांची परवानगी न घेता तीस एकरातील हजारो मौलिक असणारे औषधी आणि आयुर्वेदिक झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे

आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म असलेले हजारो मोठमोठे वृक्ष कत्तल करणारे सरपंच उपसरपंच आणि त्यांची ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक यांच्यावर वृक्षवल्ली कत्तल करणे तसेच जमीन हडप करणे आणि कोणाचाही मुलाहिजा न बाळगता मनमानी कारभार करून भारतीय जमीनक्षत्र एका व जमीन क्षेत्र नष्ट करणे या कलमाखाली सर्वांना अटक करून या सर्वांची चौकशी व्हायलाच पाहिजे अशी जनतेची मागणी आहे

दैनिक आरंभ मराठीशी बोलताना या गावातील नागरिक म्हणाले की कोणतीही जमीन संपादित करताना ग्रामसभा आणि आमसभा चा ठराव लागतो परंतु या ठकास महाठक या सरपंच उपसरपंच तसेच सदस्य आणि ग्रामसेवक सर्कल किंवा भूमी संपादित मंडळी यांनी सेटिंग करत एकमेकाची वाटणी राखत हा जमीन हडप करणे आणि वृक्ष संपदा नष्ट करणे असे हिंसक कृती केले आहे

माननीय जिल्हाधिकारी यांनी व जिल्ह्याची वनसंरक्षक अधिकारी यांनी कोणतीही परवानगी दिलेली नसताना हा घटनाक्रम आज घडीला केलेला आहे.

कायद्यामध्ये वनसंपदा नष्ट करणे तसेच सरकारी जमीन हडप करणे आणि आयुर्वेदिक औषधी गुणधर्म वनसंपदा चोरून विकणे तसेच या जंगलातील चंदन किंवा सागवान अतिशय महाग झाडे त्यांची लाकूड फाटा चोरून विकणे हे सुद्धा फौजदारी गुन्ह्याखाली घटना येते सदर फौजदारी कलमाखाली या सर्व शिंपे तालुका शाहुवाडी विद्यमान सदस्य व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक यांच्यावर कारवाई होईल का अशी जनतेची जोरदार मागणी होत आहे.

सद्यस्थितीमध्ये येथील सरपंच उपसरपंच व काही सदस्य येथील नागरिकांना तंबी देत आमचे बोलत होते की आमचे कोणी वाकडेच करू शकत नाही आणि आमच्या मागे एक राजकीय व्यक्ती आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यापर्यंत तक्रार केली तरी काही फरक पडत नाही अशी वल्गना करताना दिसतात अशा उर्मट आणि हिंसक व्यक्तीवर कारवाई करून त्यांच्या पाठीशी असणाऱ्या महसूल मधील अधिकाऱ्यांना लाचलुचपत तसेच सरकारी जमीन हडप करणे आणि वनसंपदा नष्ट करणे कलमाखाली कोणती कारवाई होईल याकडे नागरिकांचे लक्ष आहे सरकारी महसूल किंवा अन्य सरकारी अधिकारी एकमेकांचे मिलीभगत असतात असेही नागरिक बोलत होते.

सदर ग्रामपंचायत वर माननीय जिल्हाधिकारी व वनसंरक्षक जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख कारवाई करतील का याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisements
Advertisements