सम्राटबाबा महाडीक यांनी घेतले डॉ.नायकवडी समाधीचे दर्शन; गौरवभाऊ नायकवडी यांच्याकडून सत्कार
वाळवा, प्रतिनिधी(किशोर जासूद):- भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या सम्राटबाबा महाडीक यांनी वाळवा येथे पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करत दर्शन घेतले आणि अभिवादन केले. त्यांच्या या सन्मानपर भेटीने राजकीय वर्तुळात सकारात्मक चर्चेला उधाण आले आहे.
या प्रसंगी शिवसेना इस्लामपूर विधानसभा प्रभारी मा. गौरवभाऊ नायकवडी यांनी स्वतः पुढे येऊन सम्राटबाबांचा सन्मान केला व त्यांना शुभेच्छा देत राजकीय पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सौहार्दपूर्ण वातावरणात एकोप्याचा संदेश दिला गेला.
कार्यक्रमाला मा. नंदू पाटील, मा. पिंटू माळी, डॉ. राजेंद्र मुळीक, मा. इसाकभैय्या वलांडकर, उमेशभैया घोरपडे, मा. सनी अहिर यांचीही विशेष उपस्थिती होती.
सम्राटबाबांच्या या साधेपणाच्या आणि संस्कारित राजकारणाच्या शैलीला स्थानिक कार्यकर्त्यांनी भरभरून दाद दिली.
या भेटीने फक्त भाजपच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा संचारली आहे, हे निश्चित..!