ऋतुराज मासाळची कासारवाडीच्या मैदानात विजयी
टोप, (प्रतिनिधी ):-कासारवाडी तालुका हातकणंगले येथिल म्हसोबा यात्रेतील झालेल्या कुस्ती मैदानात ऋतुराज मासाळ यांने तुषार जगतापला पराभूत करत प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांकसाठी झालेल्या चटकदार लढतीत कासारवाडीचा मल्ल करणसिंह वागवे याने युवराज मेहतरला आसमान दाखवले तर यश पाटील याने शरद पाटीलला पराभवाची धुळ चारुन तृतीय क्रमांक पटकावला.
तत्पूर्वी आखाडा पुजन माजी सरपंच बाळासाहेब खोत, वस्ताद बंडा वरुटे, सरपंच अच्युत खोत यांनी केले. या मैदानावर साठहून अधिक अटीतटीच्या लढती झाल्या. यामध्ये विश्वजित पाटील, पारस कुमठाळे, मिझाज सय्यद, वरद पाटील, राजवर्धन वडिंगेकर, स्वप्निल माने, मयुर भोसले, राजु शिर्के, दौलत जोंधळे, माऊली टिपुगडे, अनिल बागडी सह कुस्तीगिरांनी विजय संपादन केला. पंच म्हणून सतिश सुर्यवंशी, गोविंद पोवार, विलास खोत, रूपेश पाटील, आनंदा पोवार यांनी काम पाहिले. निवेदन जोतिराम वांझे यांनी केले.
यावेळी सरपंच अच्युत खोत, सदस्य अभयसिंह माने, रवींद्र वागवे, विलास खोत यात्रा कमिटी अध्यक्ष अमर माने तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे, जितेंद्र देसाई, जयसिंग चेचरे, संदीप पोवार, नामदेव घाटगे, उत्तम वडिंगेकर, गणपती लुगडे, संदिप निकम, पांडुरंग लुगडे, शंकर वागवे, भैरू मोरे, सचिन माळी, जनार्दन खोत, शिवाजी घाटगे, जयसिंग यादव, मेजर प्रकाश कदम, जयसिंग खोत आदी उपस्थित होते.