पत्रकार जय कराडे न्यूज वन इंडिया चॅनलच्या “सर्वश्रेष्ठ पत्रकार पुरस्काराने” सन्मानीत
मुंबई,(प्रतिनीधी) : न्यूज वन इंडिया या नॅशनल न्यूज चॅनलचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी प्रा.जय कराडे यांना न्यूज वन इंडिया चॅनलच्या “ सर्वश्रेष्ठ पत्रकार पुरस्कार 2025 हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
मुंबई येथे न्यूज वन इंडिया या नॅशनल न्यूज चॅनलच्या आणखीन एका ऑफिसचा शुभारंभ ठाणे येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी चॅनलचे मुख्य संपादक मा.अनुराग चढ्ढा सर व चॅनेलचे सीईओ मा. रवि कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील मुख्य पत्रकार मा.फरिअल सय्यद यांच्या हस्ते प्रा. जय कराडे यांना हा ‘सर्वश्रेष्ठ पत्रकार पुरस्कार’ 2025 देण्यात आला.
यापूर्वी देखील पत्रकार कराडे यांना पत्रकारीता क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल 3 वेळा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यानी फोनवरून चॅनेलच्या नवीन कार्यालयाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच सन्मानित केलेल्या सर्व पत्रकारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के , राजन विचारे, केदार दिघे, खासदार , आमदार , विद्यमान महापौर , माजी महापौर व सर्वपक्षीय नेत्यांनी प्रत्यक्ष भेटून तर काहींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. सदरचा कार्यक्रम सोहळा दिल्ली येथील चॅनलचे मुख्य संपादक अनुराग चढ्ढा व सीईओ रवि कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. चॅनेलच्या वतीने मुंबईतील मुख्य पत्रकार फरिअल सय्यद यांच्या हस्ते सन्मानित पत्रकारांना त्यांनी केलेल्या पत्रकारीता क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल “ सर्वश्रेष्ठ पत्रकार पुरस्कार- 2025″ देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र व समानचिन्ह असे होते. या कार्यक्रमास न्यूज वन इंडिया या नॅशनल न्यूज चॅनलचे महाराष्ट्रातील सर्व पत्रकार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश उंभरे यांनी केले तर आभार फरिअल सय्यद यांनी मानले.