मसाई पठार पांडवदरा येथे बुद्ध पौर्णिमा व बुद्ध जयंती उत्साहात साजरी
वाठार,(प्रकाश कांबळे):- कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष विचार संवर्धन समिती तर्फे मसाई पठार लेणीवर बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष टी एस कांबळे व बापूसाहेब कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सामुदायिक त्रिसरण पंचशील घेण्यात आली यावेळी बुद्ध पूजा भारतीय बौद्ध सभा संस्कार समिती पन्हाळा तालुका अध्यक्ष संपतराव घोलप यांनी घेतली
यावेळी प्रास्ताविक पर भाषणात बोलताना कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष टी एस कांबळे म्हणाले की 1992 पासून या ठिकाणी सतत संघर्ष करून आजवरचा आढावा घेतला,आज आपल्या सर्वांच्या सहकार्याने सलग 36 वर्ष जयंती साजरी करीत आहोत त्याचबरोबर प्रशासनाशी वेळोवेळी या लेणीचा विकास करण्यासाठी पाठपुरावा केल्यामुळे 63 लाखाचा विकास निधी प्राप्त झाला आहे त्यातूनच या लेणीकडे येणाऱ्या रस्त्याच्या चिराच्या पायऱ्या लोखंडी ग्रील, लेणी ला दरवाजा असे काम झाले आहे अजून बराच विकास होणार असून आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे करायचा आहे त्यांनी समितीच्या मार्फत गेली 33 वर्ष राबविण्यात आलेल्या पुस्तकेची माहिती दिली
कोल्हापूर जिल्हा बौध्द अवशेष विचार संवर्धन समितीचे कार्याध्यक्ष बापूसाहेब कांबळे म्हणाले की आम्हाला असे समजले होते कि डॉ बाबासाहेब आंबेडकर पन्हाळाला येत होते व आल्यावर ते मसाई पठार वरील इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकात सम्राट अशोक सम्राट यांनी ही गुहा खोदली आहे 84 हजार बौद्ध लेणी पैकी ही एक लेणी आहे या लेणी ला ते भेट देत असतं म्हणून आम्ही सर्व मिळून 1992 ला येऊन या ठिकाणी पाहिले असता या लेणी वरती खूप झाडे, अस्वच्छता होती आम्ही आल्यानंतर येथे स्वच्छता करण्यास सुरुवात केल्यानंतर आसपासच्या गावातील लोकांनी आम्हाला विरोध केला प्रसंगी आमच्या तील काही लोकांना मारहाण ही झाली पण संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही हे आम्हाला माहीत होतं म्हणून गेली ते 33 वर्षे सतत संघर्ष केल्या मुळे सर्वांगीण विकास झाला आहे त्या मुळे सर्वांनी आपल्या हक्कासाठी लढले पाहिजे त्यासाठीच युद्ध नको बुद्ध पाहिजे म्हणून बौद्ध तंत्रज्ञान आत्मसात करा
पत्रकार प्रकाश कांबळे म्हणाले कि गेली 1992 ला या ठिकाणी येऊन कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष विचार संवर्धन समितीतील सदस्यांनी सतत 33 वर्ष संघर्ष करून या बुद्ध लेणीचा विकास केला आहे व आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 33 वी जयंती आपण साजरी करीत आहोत पण ज्या लोकांनी आपल्या अविरत संघर्ष करून आपल्याला याठिकाणी येण्यासाठी ही लेणी खुली करून दिली त्यांचे आपण आयुष्यभर ऋणी राहील पाहिजे
यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे पन्हाळा तालुका कोषाध्यक्ष अविनाश माने, अंबपचे युवराज कांबळे, तिरपण चे कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पत्रकार देवदास
बानकर यांनी सर्वांना धम्मदेसना दिली यावेळी विपुल वाडीकर, प्रवीण कांबळे, सागर कांबळे, दीपक भोसले,बाळासाहेब वाशीकर यांच्या सह हजारो बौद्ध बांधव उपस्थित होते यावेळी सुरेश सावर्डेकर यांनी सर्वांना भोजनदान दिले.