Home सामाजिक खेड तालुक्यात ‘मराठा क्रांती स्वराज्य संघटने’तर्फे भव्य राष्ट्रीय पुरस्कार सोहळा

खेड तालुक्यात ‘मराठा क्रांती स्वराज्य संघटने’तर्फे भव्य राष्ट्रीय पुरस्कार सोहळा

Advertisements

खेड तालुक्यात ‘मराठा क्रांती स्वराज्य संघटने’तर्फे भव्य राष्ट्रीय पुरस्कार सोहळा

Advertisements

 

 

 

 

खेड,(रत्नागिरी) :- सामाजिक ऐक्य आणि मराठा समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेली भारत सरकार मान्यताप्राप्त मराठा क्रांती स्वराज्य संघटना ही नेहमीच समाजहितासाठी अग्रभागी असते. या संघटनेच्या खेड तालुका विभागाच्या वतीने दिनांक ९ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता साईधाम, बिजघर (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथे एक भव्य राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा होणार

या सोहळ्यात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव . कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण महाराष्ट्र राज्याचे गृह राज्य मंत्री मा. श्री. ना. योगेशदादा कदम हे होत. त्यांना “समाजभूषण” पुरस्काराने गौरवण्यात येणार.

कार्यक्रमात मा. श्री. आ. प्रविणजी दरेकर (गटनेते, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य) यांना “जीवन गौरव” पुरस्कार, मा. श्री. मनोजराव शिंदे (माजी विरोधी पक्षनेते, ठाणे महानगरपालिका) यांना “मराठारत्न”, तर मा. श्री. राजेंद्रशेठ पाटील (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई) यांना “समाज गौरव” पुरस्काराने सन्मानित .

याचबरोबर पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे मा. श्री. अभिजीत दरेकर (संपादक, दैनिक बेधडक महाराष्ट्र व न्यूज नेटवर्क) यांनाही “समाज गौरव” पुरस्काराने गौरवण्यात येणार. हा गौरव त्यांच्या निर्भीड, लोकाभिमुख आणि निष्पक्ष पत्रकारितेची दखल घेऊन करण्यात येणार.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष मा. विजयराव कदम, महिला राष्ट्रीय अध्यक्ष मा. संध्याताई राणे, राष्ट्रीय सरचिटणीस मा. प्रदीपभाई मोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. गुरुनाथ यशवंतराव कोकण प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रकांत मोरे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख मा.महेश शंकरराव मोरे, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मा.कृष्णा शेलार जिल्हा उपाध्यक्ष मा.नागेश शिंदे, तालुका प्रमुख मा.श्रीराम कदम, तालुका संघटक मा.राजेंद्र श्रीपत कदम व अन्य मान्यवर पदाधिकारी यांचे अथक परिश्रम आहे.

या कार्यक्रमास अनेक नामवंत मान्यवर, स्थानिक कार्यकर्ते, विविध तालुक्यांतील पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित . सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे संघटनेच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करण्यात येणार.

Advertisements
Advertisements