मौजे वडगांव येथील निराधारांना मंजूरी पत्राचे वाटप
हेरले, (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार अनुदान योजना हि आर्थिक दृष्ट्या कमकुवत, निराधार ,अपंग ,विधवा , व घटस्फोटित महिलांसाठी राबविली जाते . या उपक्रमामुळे अनेक कुटूंबांना आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे .
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजने अंतर्गत गावातील ४५ लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वाटप सरपंच कस्तुरी पाटील व तलाठी सचिन चांदणे यांच्या हस्ते करण्यात आले .
याकामी खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक,आमदार अशोकराव माने , संजयगांधी निराधार योजनेचे अध्यक्ष झाकीर भालदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
या कार्यक्रमास उपसरपंच स्वप्नील चौगुले, सुनिल खारेपाटणे , सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड , ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगेपाटील, सविता सावंत, सुनिता मोरे, सुवर्णा सुतार, दिपाली तराळ , अविनाश पाटील, तंटामुक्त अध्यक्ष मधुकर आकिवाटे , प्रकाश कांबरे, महमंद जमादार, महालिंग जंगम , यांच्यासह लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते .