Home कोल्हापूर जिल्हा ABP शिक्षण समूहामध्ये महाराष्ट्र दिन उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

ABP शिक्षण समूहामध्ये महाराष्ट्र दिन उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

Advertisements

ABP शिक्षण समूहामध्ये महाराष्ट्र दिन उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

Advertisements

 

नवे पारगाव : ABP शिक्षण समूहामध्ये 66 वा महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला.
ध्वजारोहण ABP शिक्षण समुहा मधील कार्यरत सहाय्यक शिक्षिका सौ. वर्षा पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेतील सहाय्यक शिक्षक श्री के एस पवार सर उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगत मध्ये देशाच्या जडणघडणीमध्ये महाराष्ट्राचं असणारे योगदान याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रमोद चव्हाण सर यांनी केले त्यांनी आपल्या मनोगतामध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा पूर्व इतिहास सांगितला. 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हा संपूर्ण इतिहास विद्यार्थ्यांना सांगण्यात आला.
यानिमित्ताने प्रशालेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा सांगणारी भाषणे सादर केलीत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ए बी पाटील सर यांनी आपल्या मनोगतामध्ये महाराष्ट्राला शौर्याची परंपरा असून महाराष्ट्र संतांची व वीराची भूमी आहे,असे विषद केले. युवकांनी आपल्या महाराष्ट्राला बलशाली बनवून प्रगतीपथावर नेण्याचं ध्येय उरी बाळगाव असं आव्हान केलं.
श्री अमोल कुमार पाटील सर यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास संस्थेच्या पदाधिकारी संचालिका सौ राजलक्ष्मी पाटील मॅडम, संचालिका सौ आकांक्षा पाटील मॅडम, प्रशालेचे प्राचार्य श्री एस आर पाटील सर, अनिवासी विभागाचे विभाग प्रमुख श्री प्रमोद चव्हाण सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता भोसले मॅडम, ज्युनिअर कॉलेजच्या विभागप्रमुख सौ मोहिते मॅडम, यशोकां इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या सौ मगदूम मॅडम, पालक,शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एस एम बामणे व सौ एम एस खामकर यांनी केले.

Advertisements
Advertisements