गिरीष फोंडे निलबंन विरोधात निघणा-या मूक मोर्चात शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार- शिक्षक आमदार जयंत आसगावकर
कोल्हापूर / (प्रतिनिधी ) :-शिक्षक समाजसेवक म्हणून गेली अनेक वर्षे सातत्याने शैक्षणिक चळवळीतून शिक्षकांचे प्रश्न मांडणारे तसेच सामाजिक क्षेत्रातील अन्यायाविरुद्ध अग्रेसरपणे लढणारे कोल्हापूर महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षक व समाजसेवक गिरीष फोंडे यांच्या अवैध निलंबनास विरोध करून त्यांचे निलंबन त्वरीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मागे घ्यावे यासाठी गुरुवार १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भवानी मंडपातून महामनगरपालिकेवर निघणा-या भव्य मूकमोर्चात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार आहे असा निर्णय व्यासपीठाच्या विद्याभवन येथे झालेल्या सभेत घेण्यात आला. ही सभा शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली व एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
शैक्षणिक व समाजिक चळवळीमध्ये काम करणा-या कार्यकत्यास अशा प्रकारची क्रूर वागणूक देणे हे अन्यायकारक आहे असे उपस्थित विविध संघटनांच्या सदस्यांनी मत वक्त केले. या बैठकीस राहुल पवार,
आर.वाय. पाटील, राजेश वरक, भरत रसाळे, प्रा. सी. एम. गायकवाड, सुधाकर निर्मळे, एस. जे. गोंधळी, राजेंद्र कोरे, एस. के. पाटील, बाबा पाटील, दत्ता पाटील, सुरेश संकपाळ, सुदेश जाधव जयसिंग पोवार,सतिश लोहार,संजय पाटील आर.डी. पाटील आदी उपस्थित होते.