स्व.कांचन पाटील (माई) यांना पाचव्या स्मृतिदिनी अभिवादन
नवे पारगाव : नवे पारगाव तालुका हातकणंगले येथील एबीपी शिक्षण समूहाच्या अध्यक्षा सौ.कांचन पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या समाधीस्थळावर धार्मिक विधी पार पाडला त्यानंतर प्रत्येक विभागाची ज्योत घेऊन शिक्षक व विद्यार्थ्यांनी माईंना श्रद्धांजली वाहिली.
सकाळ सत्रात वंदना कांबळे यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे 11ते2 या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिनगारे स्किन अँड कॉस्मेटिक क्लिनिक पेठवडगाव, अशोकराव माने आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वाठार तर्फ वडगाव ,सिद्धिविनायक हॉस्पिटल कोल्हापूर, कुडाळकर हॉस्पिटल पेठवडगाव, डॉक्टर उपस्थित होते. डॉक्टरांनी मधुमेह, रक्तदाब, छाती धडधडणे, धाप लागणे ,कान,नाक, घसा व डोळे रक्त साखर तपासणी, इसीजी यांची मोफत तपासणी करण्यात आली यावेळी पारगाव पंचक्रोशीतील लोकांनी त्याचा लाभ घेतला.
सायंकाळी राजयोगिनी कुमारी चोरडिया यांचा ” *व्हयं मी सावित्री”* या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनपटाचे सादरीकरण केले त्याचप्रमाणे आपल्या जीवनाविषयी सांगितले. एका आई-वडिलांना नको असलेली मुलगी आज काय करू शकते याचे उदाहरण त्यांनी दिले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माईना अभिवादन केले. मा. खासदार धैर्यशील माने, मा. आमदार अशोक माने (बापू), मा. आमदार जयंत आसगावकर, युवा उद्योजक विशाल जाधव, मा. श्री प्रदीप देशमुख संचालक वारणा दूध संघ, मा.श्री एच आर जाधव ,उपाध्यक्ष वारणा दूध संघ, मा.श्री रवींद्र जाधव संचालक वारणा साखर कारखाना, मा. श्री विजयसिंह माने संचालक के डी सी बँक कोल्हापूर, मा. श्री राजेंद्र माने संस्थापक अध्यक्ष शिवाजी विद्यानिकेतन, मा. श्री परीट सर आदर्श विद्यानिकेतन ,डॉक्टर प्रताप पाटील संचालक वारणा सहकारी बँक, मा. श्री विकास माने माजी सदस्य पंचायत समिती हातकणंगले, मा. सौ दीप्ती माने सरपंच अंबप, मा. श्री अभिजीत गायकवाड दादा सचिव शाहू शिक्षण प्रसार मंडळ, मा. श्री दादासाहेब लाड तज्ञ संचालक कोजिमाशी पतसंस्था कोल्हापूर ,या सर्व मान्यवरांनी स्मृतिस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री ए. बी. पाटील सर, सचिव अमोल कुमार पाटील सर, सचिवा राजलक्ष्मी पाटील मॅडम, संचालिका आकांक्षा पाटील मॅडम, प्रशालेचे प्राचार्य एस. आर. पाटील सर, पाराशर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता भोसले मॅडम, अनिवासी विभाग प्रमुख प्रमोद चव्हाण सर, कॉलेज विभाग प्रमुख मीनल मोहिते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ एस. एम. बामणे व एम. एस. खामकर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ जयश्री जाधव व प्रमुख पाहुणे ओळख सौ व्ही. ए. पाटील यांनी केले. आभार एम. एस. खामकर यांनी मांडले.