Home कोल्हापूर जिल्हा प्राथमिक विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

प्राथमिक विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

Advertisements

प्राथमिक विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

Advertisements

 

पेठ वडगांव : येथील प्राथमिक विद्या मंदीर इयत्ता  चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका महिराज जमादार होत्या. कार्यक्रमाची सुरुवातयृ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.यावेळी विद्यार्थ्यांनी आपले शालेय जीवनातील अनुभव मनोगतातून व्यक्त केला. शिक्षक व शाळेबद्दल विद्यार्थ्यांनी कृतज्ञता मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात मुख्याध्यापिका महिराज जमादार म्हणाल्या की “शाळेतील दिवस केवळ अभ्यासापुरते सीमित नसतात; येथे मिळालेले अनुभव, संस्कार आणि मूल्येच आयुष्याचा खरा पाया घडवतात.” “शाळा ही केवळ ज्ञानाचे केंद्र नसून, येथे मिळणारे अनुभव, संस्कार आणि मूल्येच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आधारस्तंभ ठरतात” असे अनमोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल बच्चे यांनी केले व आभार प्रदर्शन माधवी सनदी यांनी केले.यावेळी वनिताबेन कोकणी,आसमा मेवकरी उपस्थित होत्या.

Advertisements
Advertisements