नवे पारगाव परिसरात वादळी पावसाचा धूमाकूळ अनेक घरांसह शेतीच मोठे नुकसान
नवे पारगाव : नवे पारगावात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या वादळ वाऱ्याने मोठे नुकसान झाले.१३ घरांची पडझड होऊन २५ लाखाचे नुकसान झाले.११ दुकान गळ्याचे १० लाख तर ग्रामपंचायत जुन्या इमारतीचे १५ लाखांचे नुकसान झाले असल्याचे गावकामगार तलाठी यानी सांगितले.
पारगाव परिसरात काल मंगळवारी झालेल्या वादळात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सुमारे साडे तीन लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती नवे पारगाव उपकेंद्रच्या कनिष्ठ अभियंता सौ कोमल पाटील यांनी दिली.
जुने पारगाव येथील ८० घरांची पडझड झाली असून ४०लाखाचे नुकसान झाले. प्राथमिक शाळेचे पाच लाख तर गाव चावडीचे चार लाख नुकसान झाले असल्याचे महसूल विभागाने सांगितले. निलेवाडी येथील एका घराची पडझड होऊन पन्नास हजाराचे नुकसान झाले.
तर घुणकी येथे गव्हाचे पीक भुईसपाट झाले असून शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे
तळसंदे येथे वादळी वाऱ्याने विजेच्या खांबावरील तारा तुटल्यामुळे रात्री व दिवसभर वीज बंद होती एका घरावरील पत्रे वाऱ्याने उडून गेली विज नसल्याने विजेवर असणारे उद्योगधंदे दिवसभर बंद राहिले.