राष्ट्रीय महामार्ग ते अंबपवाडी-मनपाडळे रस्ता तात्काळ दुरुस्त करा- संजय चौगुले

    Advertisements

    राष्ट्रीय महामार्ग ते अंबपवाडी-मनपाडळे रस्ता तात्काळ दुरुस्त करा- संजय चौगुले

    Advertisements

     

     

     

    अंबप,प्रतिनिधी(किशोर जासूद) :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 04 ते अंबपवाडी मनपाडळे हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेला असून सध्या या रस्त्याची अतिशय दयनीय व बिकट अशी अवस्था झालेली आहे, त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी या आशयाचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी उपअभियंता नितीन कांबळे यांना देण्यात आले.

    अंबपवाडी लगत असणारे औद्योगिक क्षेत्र तसेच मनपाडळे येथील श्रीसमर्थ रामदास स्थापित अकरा मारुती मंदिर पैकी एक मारुती मंदिर असल्यामुळे हा रस्ता नेहमीच वर्दळीचा ठरलेला आहे. तसेच अंबपवाडी लगत असणाऱ्या एमआयडीसी मध्ये उदरनिर्वाहासाठी आजूबाजूच्या पाच पंचवीस खेड्यातून नागरिक येण्याजाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. एमआयडीसी मधील विविध उद्योगधंद्यांची मोठ मोठी अवजड वाहने याच रस्त्याने प्रवास करत असतात, यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात सतत घडत असतात. त्यामुळे तात्काळ या रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला.
    निवेदनावर बोलताना, कार्यकारी उपअभियंता नितीन कांबळे यांनी येत्या पंधरा दिवसांमध्ये रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित शिवसैनिकांना दिली.
    यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण भाऊ, उप तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील , युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील मगदुम सागर चोपडे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश चव्हाण, उदयसिंह शिंदे, अनिल दबडे नाना, काका पाटील, अमर पाटील, राजेंद्र कुंभार, ऋषिकेश दबडे ,मोहन सुभेदार , गणपतराव पोवार ,सुरेश उपाध्ये, पंडित निर्मळे, निलेश खुर्द, राजेंद्र पठाण, सुनील जाधव, अमित नायकवडी, विक्रम साबळे, विनोद पाटील आप्पा यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements