Home कोल्हापूर जिल्हा महिलांनी उद्योजकतेच्या स्वप्नांची जोपासना करावी -“हार्ले लेडी” निशिगंधा कदम पाटील यांचे आवाहन

महिलांनी उद्योजकतेच्या स्वप्नांची जोपासना करावी -“हार्ले लेडी” निशिगंधा कदम पाटील यांचे आवाहन

Advertisements

महिलांनी उद्योजकतेच्या स्वप्नांची जोपासना करावी
-“हार्ले लेडी” निशिगंधा कदम पाटील यांचे आवाहन

Advertisements

 

नवे पारगाव : तळसंदे तालुका हातकणंगले येथील डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाने उद्योजकता मार्गदर्शन महिलांमध्ये बदल घडवण्यासाठी प्रचंड क्षमता असते. त्यामुळे त्यांनी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेऊन यशाकडे वाटचाल केली पाहिजे. विद्यार्थिनी आणि महिलांनी उद्योजकतेच्या स्वप्नांची जोपासना करावी. चिकाटीच्या जोरावर नवनव्या संकल्पना सत्यात उतरवल्यास अनेकजणी यशस्वी उद्योजिका म्हणून नाव मिळवतील असा विश्वास “हार्ले लेडी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उद्योजिका निशिगंधा कदम पाटील यांनी व्यक्त केला.

डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे महिला सशक्तिकरण कक्षाद्वारे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना निशिगंधा कदम पाटील पाटील यांनी उद्योजकीय प्रवास, आलेल्या अडचणी, त्यातून काढलेले मार्ग याबाबत माहिती दिली. निशिगंधा कदम पाटील या एमबीए पदवीधर असून कोणतीही कौंटुंबिक व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी विविध व्यवसाय यशस्वीपणे सुरू केले. त्या बाइक रायडर असून “हार्ले लेडी” म्हणूनही ओळखल्या जातात.

कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन म्हणाले, महिलांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये, विशेषतः उद्योजकतेमध्ये प्रभावीपणे पुढे जाण्याची क्षमता आहे. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य अतिशय उच्च दर्जाचे असते. नव्या संधी असलेली क्षेत्र ओळखून त्यात विद्यार्थीनिनी पाउल टाकणे गरजेचे आहे. समाजाने महिलांच्या या प्रयत्नान पाठबळ देणे गरजेचे आहे.

कृषी अभियांत्रिकी विभागच्या सहयोगी अधिष्ठाता व महिला सशक्तिकरणच कक्षच्या अध्यक्षा डॉ. मंगल पाटील यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून देत महिला सशक्तिकरण कक्षाच्या कार्यप्रणालीची माहिती दिली.

एम बी ए-कृषी व्यवसाय व्यवस्थापन विभागाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. शुभांगी जगताप यांनी आभार मानले.यावेळी कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, अधिष्ठाता डॉ. मुरली भूपती, परीक्षा नियंत्रक डॉ. गुरुनाथ मोटे, वित्त अधिकारी सुजित सरनाईक, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कुलपती डॉ. संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व सल्लागार पूजा ऋतुराज पाटील यांनी महिलादिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Advertisements
Advertisements