Home कोल्हापूर जिल्हा शिक्षक व सेवकांच्या २१ मार्चचा लक्षवेधी आक्रोश मोर्चास शैक्षणिक व्यासपीठाचा पाठींबा

शिक्षक व सेवकांच्या २१ मार्चचा लक्षवेधी आक्रोश मोर्चास शैक्षणिक व्यासपीठाचा पाठींबा

Advertisements

शिक्षक व सेवकांच्या २१ मार्चचा लक्षवेधी आक्रोश मोर्चास शैक्षणिक व्यासपीठाचा पाठींबा

Advertisements

 

कोल्हापूर / (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीने सन १९८२ / ८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी तसेच टप्पा अनुदान शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा यासह अनेक मागण्या कायम ठेवत जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खाजगी प्राथमिक, महानगरपालिक,नगरपालिका शिक्षक व सेवकांच्या वतीने शुक्रवार दि. २१ मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या लक्षवेधी आक्रोश मोर्चास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा पाठींबा देण्याचे बैठकीत जाहिर करण्यात आले.व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड व शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लक्षवेधी आक्रोश आंदोलनामध्ये मागण्या पुढील प्रमाणे १९८२ /८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी, टप्पा अनुदानावरील शाळांना पुढील टप्पा मिळावा, शिक्षण सेवक पद रद्द व्हावे, डीसीपीएस धारक प्राथमिक, माध्यमिक, खाजगी प्राथमिक, नगर पालिका, महानगर पालिका शिक्षकांना मार्च २०२१नंतर डीसीपीएस रक्कमेवरील व्याज व शासन हिस्सा अनुदान मिळावे, अनुकंपा आणि कुटुंब निवृत्ती वेतन बाबतची कार्यवाही तात्काळ व्हावी, १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा अन्यायी शासन निर्णय रद्द व्हावा,सातव्या वेतन आयोगातील वरीष्ठ वेतन श्रेणी त्रुटी दुरुस्त व्हावी, शिक्षकासाठी १०, २०, ३० आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, अनुकंपा शिक्षकासाठी टीईटी ची अट रद्द व्हावी, यासह अनेक मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा शुक्रवार दि. २१ मार्च रोजी दुपारी २ वा. टाऊन हॉल ते शिक्षण उपसंचालक कार्यालयावर काढण्यात येणार आहे. सदर बैठकीत शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरास विरोध करण्यात आला.
या बैठकीस आर. वाय. पाटील,भरत रसाळे, शिवाजी माळकर, सुधाकर निर्मळे, सुदेश जाधव, करणसिंह सरनोबत, मंगेश धनवडे, सतीश लोहार, संतोष गायकवाड, प्रमोद पाटील, आनंदा बनकर, मारुती फाळके आदीसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत बोलतांना शिक्षक आमदार जयंत आसगावकर शेजारी अध्यक्ष एस. डी. लाड, भरत रसाळे, शिवाजी माळकर आदी मान्यवर.

Advertisements
Advertisements