Advertisements
सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलला इन्वर्टर व बॅटरी भेट
Advertisements
रत्नागिरी : दिवसेंदिवस ऑनलाईन कामाचा वाढता भार व विजेच्या अनियमितपणा यामुळे प्रशालेस
इन्वर्टर आणि बॅटरीची आवश्यकता पाहून सैतवडे परिसरातील काही शिक्षणप्रेमी कडून वीस हजार रुपयाची इन्वर्टर आणि त्याची बॅटरी शाळेला भेट देण्यात आली. याकामी जांभारी गावचे सरपंच आदेश पावरी, ग्रामसेवक संदिप जाधव,यश अशोक राजवाडकर व सुयोग संतोष आडाव यांनी ही महत्वपूर्ण भेट दिली. प्रशालेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी रुमान पारेख, न्यू इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका सिद्धी लांजेकर,निवास पाटील सर आदी उपस्थित होते.
Advertisements
Advertisements