सैतवडे येथील ओपन जिमचे उद्घाटन
रत्नागिरी,(प्रतिनिधी):- रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे ( गुम्बद ) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून मागासवर्गीय वस्तीसाठी मंजूर झालेल्या ओपन जिमचा आज सरपंच उषा सावंत यांनी फीत कापून तसेच उपसरपंच मुनाफ वागळे यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बानु खलपे, अनिल आधव उपस्थित होते.या जिमचा वापर नागरिक याबरोबरच विद्यार्थी यांना होणार आहे.यावेळी सर्वांचे स्वागत मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी केले. ग्रामपंचायतीने उभारलेल्या या जिमबद्दल दि मॉडेल इंग्लिश स्कुलच्या व मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीनेही आभार मानन्यात आले. यावेळी श्रीमती सुवर्णा देशमुख, श्रीमती ऋतुजा जाधव, अविनाश केदारी,पोवार सर,रुमान पारेख, सोनाली निवेंडकर,सागर पवार,नौशाद मुल्ला, राजेंद्र कदम आदी उपस्थित होते.