तळसंदे येथील सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक वारणा दूध संघाचे संचालक माधव प्रभाकर गुळवणी यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. बी. नाईक व सहाय्यक म्हणून संस्थेचे सचिव भैरू बाबुराव चव्हाण यांनी काम पाहिले.
सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेची २०२५-३० या कालावधीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. १३ जागांसाठी २५ अर्ज दाखल झाले होते . छाननीनंतर फक्त १३ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी वारणा दूध संघाचे तज्ञ संचालक मोहन येडूरकर यांचे सहकार्य लाभले.
बिनविरोध निवड झालेले उमेदवार असे- माधव प्रभाकर गुळवणी, संपत बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब रामचंद्र चव्हाण, दिलीप मारुती चव्हाण, हंबीरराव संभाजी चव्हाण, सर्जेराव रामचंद्र चव्हाण, अरुण विठ्ठल चव्हाण, सुभाष परसू पोवाळकर, सावित्री भीमराव पाटील, आनंदी बाळासाहेब खामकर, राजीव युसुफ तांबोळी, भानुदास गोविंद कांबळे, मारुती दगडू वडार. छाननी प्रसंगी रघुनाथ मोकाशी, कुबेर चव्हाण, अरुण चव्हाण यांनी सहकार्य केले.