बळवंतराव यादव विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
पेठ वडगाव : विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाल्याचा आनंद वेगळा असतो. पारितोषिकामुळे विद्यार्थ्यांना प्रगतीचा मूलमंत्र मिळतो.ज्या विद्यालयात जीवनातील शिक्षणाचे धडे घेतले त्याच विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले हा माझ्या जीवनातील मोठा सन्मान म्हणावा लागेल.असे उद्गगार दैनिक सकाळचे प्रशासन विभाग प्रमुख शरद पाटील यांनी काढले ते पेठवडगाव येथील बळवंतराव यादव विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार होते. यावेळी संस्था कार्यवाह अभिजीत गायकवाड, प्राचार्य अविनाश पाटील, उपप्राचार्य किरण कोळी, उपमुख्याध्यापिका मनीषा पोळ, पर्यवेक्षक मनोज शिंगे,संताजी भोसले,पी.बी.पाटील प्रमुख उपस्थितीत होते.
राहूल पवार म्हणाले, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शारीरिक सांस्कृतिक बाबींची घडण होत असते यातूनच जिद्द व चिकाटी निर्माण होत असते.सर्वच क्षेत्रात सातत्य ठेवल्यास नक्की यश मिळते. यावेळी विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
स्वागत, प्रास्ताविक प्राचार्य अविनाश पाटील यांनी केले.अनुष्का पाटील या विद्यार्थिनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रेणिक सरडे, प्रियदर्शन पोवार,सचिन संकपाळ, राहुल निचिते, विजय मोरे,दिलीप नाईक,धनाजी कराडे, केतन खटावकर,भीमसेन सनदी, विनायक पोवार,राहूल जाधव,संजीवनी दिंडे,शैलजा पाटील, वैशाली पवार,प्रज्ञा कुंभार,प्रशांती बसागरे,मानसी बुवा,सीमा पाटील, विजय शिंदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार उपमुख्याध्यापिका मनिषा पोळ सूत्रसंचालन प्रशांत भोरे,अश्विनी बंडगर यांनी केले.