दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे नवीन कायद्यासंदर्भात कार्यशाळा संपन्न

    Advertisements

    दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे नवीन कायद्यासंदर्भात कार्यशाळा संपन्न

    Advertisements

     

    जयगड ,(प्रतिनिधी):- जयगड पोलीस स्टेशनच्या वतीने  सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये नवीन कायद्याच्या माहिती व जनजागृती संदर्भात कार्यशाळा उत्साहात साजरी करण्यात आली.

    या कार्यशाळेसाठी जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील व स्टाफ , मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल माद्रे उपस्थित होते.

    यावेळी पाटील यांनी नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात माहिती दिली.इंग्रज काळापासून भारतीय दंड संहिता १८६० ऐवजी आता भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ या नवीन कायद्याने ओळखले जातील. तसेच सर्वांनी सजग राहील्यास ऑनलाइन गुन्हेगारीला आळा घालता येईल असेही ते म्हणाले. यावेळी मार्गदर्शन करताना विलास कोळेकर म्हणाले, शून्य एफआयआर, इलेक्ट्रॉनिक मार्गाने तक्रारीची नोंद व गंभीर गुन्ह्यासाठी व्हिडीओग्राफी अनिवार्य केलेली आहे.या बदलामुळे सर्व सामान्य लोकांना न्याय मिळणे सोपे झाले आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कायदा साथी अरुण मोर्ये यांनी ही यावेळी मार्गदर्शन केले.

    यावेळी दि मॉडेल चा माजी विद्यार्थी विवेक निवेंडकर याची मुंबई पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. दि मॉडेल मधील विद्यार्थ्यां बरोबर न्यू इरा इंग्लिश स्कुलचे विद्यार्थीही या कार्य शाळेत सहभागी झाले होते. याप्रसंगी मुख्याध्यापक अंतुले, पत्रकार उदय महाकाळ व संकेत ढवळे,ग्रामपंचायत सदस्य बानू खलपे, यावेळी परिसरातील पोलीस पाटील सर्वश्री  मंगेश भडसावळे (वाटदचे ) ,उमेश चौगुले (जांभारी ) ,महेश महाकाळ (पन्हळी ) ,श्रीकांत खापले (सत्कोंडी ) ,सुहानी बलेकर (कांबळे लावगण) ,समिक्षा वासावे,आदी अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements