डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पस येथे कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडीया स्टूडंट चॅप्टरची स्थापना
तळसंदे, : डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पस ,तळसंदे येथे “कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडीया ” (सी एस आय) स्टूडंट चॅप्टरचा उद्घाटन सोहळा आय.टी.असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष तसेच वॉलस्टार टेक्नॉलॉजी प्रा.लि.कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
सी एस आय स्टूडंट चॅप्टरचे अध्यक्ष श्री वरद वेसणेकर यांनी प्रास्ताविकमध्ये चॅप्टरची भूमिका व घेण्यात येणारे विविध उपक्रम व कार्यशाळा यांबद्दल माहिती दिली.
कॉलेजचे संचालक डॉ. सतीश पावसकर म्हणाले, सी.एस.आय. टेक्निकल कॅम्पस मध्ये तांत्रिक ज्ञानाच्या क्षेत्रात एक नवीन अध्याय सुरू होत आहे. सी एस आय चॅप्टर विद्यार्थ्यांना कार्यशाळा, सेमिनार आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आणि माहिती तंत्रज्ञान व संगणक क्षेत्रातील व्यावसायिक विकासासाठी एक उत्तम मंच प्रदान करेल. विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी मार्गदर्शक ठरेल याचा विश्वास वाटतो.
प्रमुख अतिथी प्रताप पाटील यांनी नवनवीन तंत्रज्ञान व त्यांचे महत्त्व या विषयावर विचार मांडले. तसेच विद्यार्थ्यांना सी एस आय स्टूडंट चॅप्टर मध्ये सहभागी झाल्याने त्याचा करिअर घडविण्याच्या दृष्टीने कसा उपयोग होईल या संदर्भात मार्गदर्शन केले.
सी एस आय समन्वयक प्रा.मिनाक्षी पाटील यांनी आभार मानले.
यावेळी संगणक विभागप्रमुख उमेश पाटील व डॉ. दिपाली निकम, अधिष्ठाता एम जे पाटील , श्री आर एस पवार, प्राध्यापक व सी एस आय विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील ,उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील , विश्वस्त ऋतुराज संजय पाटील , पृथ्वीराज संजय पाटील ,तेजस सतेज पाटील , कार्यकारी संचालक डॉ.ए के गुप्ता , रजिस्ट्रार प्रकाश भागाजे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.