वडगावात 76 वा प्रजासत्ताक दिन व संविधान गौरवदिन उत्सहात साजरा
पेठवडगाव : येथील पालिका चौकातील बळवंतराव यादव हायस्कूल मराठी शाखेच्या प्रांगनाथ 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व संविधान गौरवदिन उत्सहात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण माजी नगराध्यक्षा सौ.विद्याताई पोळ यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून वडगाव पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुमित जाधव हे होते. यावेळी यादव आघाडीच्या वतीने वडगाव शहरातील सर्व समाजील मान्यवरांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांचा शाल श्रीफळ व संविधान प्रत देऊन मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सैनिक, विविध सामाजिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवर,माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरीक,यादव आघाडीचे कार्यकर्ते, डॉ. सायरस पुनावाला स्कुलचे, बळवंतराव यादव विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.