Home मुंबई आमदार प्रविणभाऊ दरेकर यांच्या हस्ते क्षत्रिय मराठा को-ऑप.क्रेडिट सोसा.लि.घाटकोपर शाखेचा शुभारंभ

आमदार प्रविणभाऊ दरेकर यांच्या हस्ते क्षत्रिय मराठा को-ऑप.क्रेडिट सोसा.लि.घाटकोपर शाखेचा शुभारंभ

Advertisements

आमदार प्रविणभाऊ दरेकर यांच्या हस्ते क्षत्रिय मराठा को-ऑप.क्रेडिट सोसा.लि.घाटकोपर शाखेचा शुभारंभ

Advertisements

 

मुंबई,(प्रतिनिधी) :- गुंतवणूक नात्यांची, समाजाच्या प्रगतीची ब्रीद वाक्य सांगत मध्य कोकण क्षत्रिय मराठा को – ऑप. क्रेडिट सोसायटी ली. घाटकोपर पूर्व शाखेचा उद्घाटन सोहळा विधानपरिषदेचे गटनेते मान, आमदार श्री प्रविणभाऊ दरेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी आमदार कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, पराग शाह यांच्या सह अनेक मान्यवर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

या वेळी बोलताना गटनेते विधानपरिषद मान. प्रविणभाऊ दरेकर यांनी सांगितले ही पतपेढी स्थापना सन १९३६ साली आमच्या नात्यातील, रत्नागिरी, रायगड सोयर्या पाहुण्यांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यापूर्वी सुरू केली मात्र निधी अभावी ती बंद पडली. तिला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रविणभाऊ यांनी चंग बांधला आणि आज उद्घाटन कर्ते झाले व उपस्थितांना आवाहन करताच एक कोटी पेक्षा जास्त निधीची ठेव संकलन करून सहकारातील आपली विश्वासार्थता सिद्ध केली. लवकरच पोलादपूर शाखेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुंबई बँक अध्यक्ष व विधान परिषदेचे गटनेते प्रविणभाऊ दरेकर यांनी सांगितले. या वेळी बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले आमचे खेड तालुका अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांच्या कोतवाल वडगाव रस्त्याच्या मागणी संदर्भात एक निवेदन देण्या करिता माझी ३८ वर्षांनी भेट झाली. समाजाच्या नावाने सहकार क्षेत्रातील माझ्या जुन्या सहकारी मित्राची यशस्वी गरुड झेप अचंबित करणारी होती.३८ वर्षापूर्वी आमची राजसाहेब यांच्या फ्लायिंग सॉसर या दादर येथील हॉटेलात शेवटची भेट त्या नंतर आज भेटलो. भरगच्च कार्यक्रम पार पाडत असताना समाजासाठी आमची काही मदत लागली तर अवश्य या, भेटा असे आश्र्वासित करत निरोप घेतला. अध्यक्ष राजेश येरूनकर, अंकुश मोरे, सुभाष पवार, अजय बाबर यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Advertisements
Advertisements