हेर्ले; मोटरसायकलला भरधाव तवेराची धडक एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कोल्हापूर – सांगली महामार्गावर हेर्ले गावभाग फाट्याजवळ भरधाव तवेराने पाठीमागुन स्पेलंडर मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील महंमद धोंडीबा खतीब (वय 55 वर्ष) रा. हेर्ले ता. हातकणंगले हे जागीच ठार झाले तर राजेंद्र दत्तू माने (वय 59) रा. हेर्ले हे गंभीर जखमी झाले. अपघात सकाळी नऊ वाजता घडला. घटनास्थळावरून व पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की हेर्ले येथील राजेंद्र दत्तू माने व महंमद धोंडीबा खतीब हे आपले शेतातील काम आटोपून घरी निघाले होते. गावभाग फाट्याजवळ मोटर सायकल वरून रस्ता ओलांडत असताना मिरजेहून कोल्हापूर कडे भरधाव वेगाने निघालेल्या तवेराने पाठीमागुन मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये महंमद खतीब हे मोटरसायकल वरून उडून खाली पडले व त्यांच्या अंगावरून तवेरा गेल्यामुळे ते जागीच ठार झाले. तर मोटरसायकल वरील राजेंद्र दत्तू माने हे गंभीर जखमी झाले.तवेराने जोराची धडक दिल्यामुळे मोहम्मद खतीब रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.अपघात होताच तवेरा चालकाने पलायनकेले.