Home शैक्षणिक बळवंतराव यादव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेत यश

बळवंतराव यादव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेत यश

बळवंतराव यादव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेत यश

 

 

पेठवडगाव,(प्रतिनिधी:-आदर्श विद्यानिकेतन, मिणचे येथे झालेल्या तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेठवडगाव येथील बळवंतराव यादव विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.सतरा वर्षांखालील वयोगटात जान्हवी जगन्नाथ चिखले हिने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच चौदा वर्षांखालील वयोगटात अर्णव अमर ढेरे याने प्रथम क्रमांक मिळविला.या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष व माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ ,उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव व सचिवा विद्याताई पोळ संस्था कार्यवाह अभिजीत गायकवाड यांचे प्रोत्साहन मिळाले.तसेच

मुख्याध्यापक ए. जी. पाटील , उपमुख्याध्यापिका एम.आर.पोळ, पर्यवेक्षक एम. जे. शिंगे, एस.बी. भोसले, पी. बी. पाटील यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. तसेच क्रीडा मार्गदर्शक बी. एल. सनदी यांचे विशेष सहकार्य लाभले.