Home शैक्षणिक संजय घोडावत स्कूलमध्ये CBSE क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचा उद्घघाटन सोहळा उत्साहात

संजय घोडावत स्कूलमध्ये CBSE क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचा उद्घघाटन सोहळा उत्साहात

संजय घोडावत स्कूलमध्ये  CBSE क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचा उद्घघाटन सोहळा उत्साहात

 

 

कुंभोज, प्रतिनिधी ( विनोद शिंगे):-संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सन 2024 च्या  CBSE क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचा दि 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.00 वा. उद्घघाटन समारंभ यशस्वी पार पडला. आंतरराष्ट्रीय खेळाडू, ॲथलेटिक चॅम्पियन रिया पाटील, संजय घोडावत समूहाचे अध्यक्ष श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री. विनायक भोसले, सीबीएसई निरीक्षक श्री प्रमोद पाटील, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्राचार्य डॉ. विराट गिरी, श्री. दीक्षित, मॅनेजर, बँक ऑफ बडोदा, सहोदया कॉम्प्लेक्स कोल्हापूर, अंतर्गत विविध शाळांचे प्रिन्सिपल यांच्या उपस्थित पार पडला. सलग 10 व्या वर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला मिळाला आहे. महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दिव दमन येथील 160 पेक्षा अधिक सीबीएसई शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या आहेत. 1500 पेक्षा अधिक खेळाडू 14, 17 व 19 या वयोगटातील विविध ॲथलेटिक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. तीन दिवस या स्पर्धा संजय घोडावत स्कूलच्या मैदानावर चालणार आहेत.

या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी श्री संजय घोडावत यांनी वायनाड, केरळ येथील भूस्खलन प्रकल्प ग्रस्तांसाठी 11 लाखांचा चेक ‘केरळ मुख्यमंत्री रिलीफ फंड,’ यांच्याकडे सुपूर्द केला. उदघाटन प्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी, रिया पाटील म्हणाल्या, “शारीरिक विकासासोबत मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ जीवनात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. अपयशाने खचून जाऊ नका कारण यशाची सुरुवात अपयशातूनच होते.”

यावेळी बोलताना श्री संजय घोडावत म्हणाले, “स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. सहभागी खेळाडूंनी आपल्यामधील कौशल्य व मेहनत यांच्या जोरावर यश प्राप्त करावे. खेळाकडे एक करियर म्हणून पहावे. खेळातून आपल्या देशाचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करावा. यश आणि अपयश खिलाडू वृत्तीने स्वीकारावे”.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यानी प्रमुख अतिथींचे औक्षण करून स्वागत केले. तसेच स्वागतगीत व नृत्य सादर केले. त्यानंतर सर्व सहभागी शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींना मानवंदना देत संचलन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे पूजन करण्यात आले. अतिथींनी क्रीडाध्वज फडकवून विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देऊन खेळाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच एम नवीन, प्राचार्य श्री अस्कर अली, प्राचार्य श्री नितेश नाडे, सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरित कुंभार, मान्या सारडा, आलिया, आर्य, रियान यांनी केले.