जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन-शिवाजी माने
कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-महाराष्ट्र सरकारने साडेसात एचपी पर्यंत विद्युत भार असणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वेळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे, याबद्दल जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करण्यात आले.
सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार अनेक अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकरी या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेपासून वंचित राहत आहेत. अशा अनेक कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामायिक क्षेत्रासाठी पासून दहा एचपी पासून 25 ते 30 एचपी पर्यंतचे पंप बसवून आपली शेती सिंचनाखाली आणलेली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना देखील मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजनेमध्ये समावेश करून त्यांनाही इतर शेतकऱ्यांप्रमाणे मुख्य प्रवाहात आणावे, अशी मागणी आज संघटनेच्या वतीने व हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले.
यावेळी उपस्थित संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, गब्बर पाटील, महेश मोहिते, शितल कांबळे, रेंदाळहून बी एम पाटील, भाऊसाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, आबासो पाटील, नामदेव पाटील, शंकर पाटील, बंडोपंत पाटील, बाबासो पाटील, बाबासो घोडेस्वार, रवी माळी आदी उपस्थित होते.