शिये बालिका खून प्रकरणी विशेष तपास पथक :आरोपीस 5 दिवसाची पोलीस कोठडी
पेठ वडगांव,(प्रकाश कांबळे ):-शिये ता करवीर येथे 10 वर्षाच्या चिमूरडी वर पाशवी बलात्कार व अमानुष मारहाण करून खून करण्यात आला या प्रकरणातील आरोपीस जास्तीत जास्त लवकर व कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे हे पथक आवश्यक ती सर्व माहिती घेऊन त्याप्रमाणे कागदपत्रे तयार करतील व जलदगती न्यायालयात सादर करतील जेणेकरून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली गुरुवारी शिये ता करवीर येथील रामनगर परिसरात दहा वर्षाच्या मुलीवर घडलेल्या बलात्कार व खून प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांनी भेट दिली त्यावेळी ते पत्रकाराशी बोलत होते ते म्हणाले गुरुवारी शिये येथे घडलेल्या घटनेचे गांभीर्य मोठे आहे या घटनेची चौकशी व नराधम दिनेश कुमार केशवाह साह याच्या विरोधात भक्कम पुराव्यानिशी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी करण्याचे पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे या पथकामध्ये दोन महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक महिला पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, शिरोली एम आय डी सी पोलीस यांचा समावेश करण्यात आला आहे हॆ येत्या पंधरा दिवसात सर्व आवश्यक ती कागदपत्रे व पुराव्या गोळा करतील व न्यायालयात सादर करतील आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे यासाठी आमचा पर्यंत आहे असे ते म्हणाले व पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांना आधार देत त्यांचे सांत्वन केले दरम्यान या प्रकरणातील आरोपी दिनेश कुमार केशवाह साह याला कोल्हापूर येथील हाजर केले असता त्याला 28 ऑगस्ट पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
आय जी फुलारी पुढे बोलताना म्हणाले की शिरोली एमआयडीसी भागात रोजगार उपलब्ध असल्याने परप्रांतीय लोक या परिसरात आले आहेत त्यामुळे शिरोली,नागांव, शिये, टोप परिसरात ते भाड्याने खोल्या घेऊन राहत आहेत.अशा परप्रांतीयांचे संबंधित गावातील सरपंच, ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांनी जबाबदारी घेऊन त्यांची चौकशी करून दाखले, पुरावे गोळा केले पाहिजेत त्यांची पार्श्वभूमी तपासणी करण्यात आली पाहिजे त्यामुळे अशा प्रकरणाच्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.