Home मुंबई रक्षाबंधनाचे एसटी महामंडळाला 121 कोटीचे उत्पन्न 

रक्षाबंधनाचे एसटी महामंडळाला 121 कोटीचे उत्पन्न 

रक्षाबंधनाचे एसटी महामंडळाला 121 कोटीचे उत्पन्न

 

मुंबई :- नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे ‘रक्षाबंधन’. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. यंदा रक्षाबंधन आणि लागोपाठ आलेल्या सुट्ट्यामुळे दिनांक 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीच्या वेगवेगळ्या बसणे प्रवास करून  प्रतिसाद दिला यामुळे दिनांक  17 ते 20 ऑगस्ट या चारच दिवसात एसटी महामंडळाला सुमारे 121 कोटी रुपयांचे भरगोस उत्पन्न मिळाले आहे.

रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 ऑगस्टला सुमारे 35 कोटी रुपयांचे भरगोस उत्पन्न एसटी महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षातील हे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळाले आहे. एसटीला दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळते एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक,उपाध्यक्ष डॉ.महादेव कुसेकर यांनी हि माहिती दिली.

रक्षाबंधनानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल व्यवस्थापकीय संचालक डॉ. महादेव कुसेकर यांनी आभार मानले. तसेच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करून विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.