साहेब…, आमचे मानधन देणार कधी ? “मातृवंदना” च्या लाभार्थ्यांचा सवाल : १४४६ महिला पाच हजार रुपये मिळण्याच्या प्रतीक्षेत
कुंभोज प्रतिनिधी :(विनोद शिंगे)- लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र दुसरीकडे मातृ वंदना योजनेचे पाच हजार रुपये अनेक महिलांना मिळालेले नाहीत. जिल्ह्यात १६ हजार २६९ महिलांची प्रकरणे मंजूर आहेत परंतु यातील १४३६ महिलांना अजूनही मानधन मिळालेले नाही. काही महिन्यापूर्वी सॉफ्टवेअर बदलल्याने काही महिलांना हे अनुदान मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेत पहिला हप्ता तीन हजार रुपये व दुसरा हप्ता दोन हजार रुपयाचा आहे. या योजनेचा तर योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात थेट सहा हजार रुपये एकाच वेळी जमा करण्यात येतात.
*काय आहे मातृवंदना योजना?
महिलांची प्रस्तुती घरात असुरक्षित पद्धतीने होऊ नये यासाठी सुरक्षित आणि शासकीय रुग्णालयातील प्रस्तुतीला प्राधान्य देण्यासाठी सन २०१८ पासून मातृ वंदना योजना सुरू करण्यात आली आहे.
*योजनेच्या पहिल्या रचनेनुसार तीन टप्प्यात पाच हजार रुपये देण्यात येत होते आता यात बदल करण्यात आला आहे. आता पहिल्या आपत्य वेळी नोंदणी केल्यावर तीन हजार रुपये तर प्रस्तुती नंतर बाळाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार रुपये देण्यात येत होते.
*बदललेल्या रचनेनुसार पहिल्या आपत्यावेळी योजना तशीच सुरू असून दुसऱ्या आपत्यावेळी महिला लाभ घेणार असल्यास आणि तिला मुलगी झाल्यास थेट ६ हजार रुपये एकाच वेळी खात्यावर जमा होणार आहेत.
निकष काय ?
*गरोदर झाल्यावर १५० दिवसात शासकीय रुग्णालयात संबंधित महिलेची नोंदणी आवश्यक
*प्रस्तुती नंतर बाळाचे लसीकरण पूर्ण आवश्यक
*आधार कार्ड अद्यावत आवश्यक
{ २१ हजार ४७८ प्रकरणांना मंजुरी सप्टेंबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ अखेर २४ हजार ८०० एकूण नोंदणी करण्यात आली यातील ३०८ महिलांचे आधार कार्ड नसल्याचे स्पष्ट झाले आहे यातील २१हजार ४७८ प्रकरणा मंजुरी मिळाले आहे परंतु १४३६महिलांना मानधन मिळालेच नाही. } तरी माय बाप सरकार यांनी मातृवंदनाचा लाभ मिळावा हीच प्रतीक्षेत वंचित महिलांवर्गाची मागणी होत आहे.