Home Breaking News रांगोळी येथे 2515 मधून पाच लाखाच्या विकास कामांचे अशोकराव माने यांच्या हस्ते...

रांगोळी येथे 2515 मधून पाच लाखाच्या विकास कामांचे अशोकराव माने यांच्या हस्ते उद्घाटन

रांगोळी येथे 2515 मधून पाच लाखाच्या विकास कामांचे अशोकराव माने यांच्या हस्ते उद्घाटन

 

 

हातकणंगले, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक,माजी मंत्री व आमदार डॉ विनयरावजी कोरे व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामविकास विभागाच्या 2515 योजनेतून *रांगोळी ता. हातकणंगले* या गावच्या विकास कामांसाठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

या विकास कामांचा उदघाटन सोहळा हातकणंगले विधानसभा प्रमुख दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापू) यांच्या शुभहस्ते व लोकनियुक्त सरपंच सौ संगीता सुभाष नरदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी *उपसरपंच शिवाजी सूर्यवंशी,भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील,ग्रा प सदस्य किरण कमते, सुदर्शन पाटील,रजनीकांत माने,हुमायून मुलाणी*,सौ सविता मोरे,सौ आश्विनी जंगले,सोनाली कांबळे,सौ स्वाती कांबळे,सौ अश्विनी मगदूम,माजी सरपंच नारायण भोसले,पप्पू मगदूम,दत्तात्रय मोरे,शितल मगदूम,कुबेर कांबळे,मानसिंग कांबळे,रामचंद्र देवणे, पुंडलिक मोरे,राजेंद्र मांगुरकर, सौ संगीता घोरपडे,शुभम देसाई,सौ माधुरी वाडकर यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला भगिनी,पत्रकार बंधू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.