Home कोल्हापूर जिल्हा भांडण मिटवण्याच्या बहाण्याने बोलवून रूई येथे एकाचा खून 

भांडण मिटवण्याच्या बहाण्याने बोलवून रूई येथे एकाचा खून 

भांडण मिटवण्याच्या बहाण्याने बोलवून रूई येथे एकाचा खून

 

 

हातकणंगले, प्रतिनिधी (विनोद शिंगे):- रुई ता.हातकणंगले येथील सचिन बाबासो कांबळे ( रा माळभाग आंबेडकरनगर रुई ) यास भांडण मिटवतो म्हणून बोलवून घेऊन त्याला काठी दगडाने लोखंडी रॉड ने मारहाण करत त्याचा खून केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला या प्रकारामुळे रुई गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले तात्काळ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस बंदोबस्त तैनात केला

मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास रुई गावातील दोघे कार्यक्रमासाठी मिठाई घेऊन येण्याकरीता इचलकरंजी येथे गेले होते मिठाई घेऊन गावी येत असताना त्यांना कामगार चाळी जवळ अडवून आम्हाला तुमचा मागील भांडणातीला राग असून तुम्हांला सोडणार नाही म्हणत अंगावर येण्याचा प्रकार केला त्यावेळी घाबरून संबंधित युवकांनी तेथून काढता पाय घेतला व घडलेला प्रकार रुई येथे येऊन संदीप सूर्यकांत कांबळे ,सचिन बाबसो कांबळे , विजय मुरलीधर जिरगे यांना सांगितला यावेळी आता तुम्ही घरी जावा आपण यावर उद्या बोलु असे समजून घरी जाण्यास सांगितले 16 ऑगस्ट दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास साठे नगर मधील एका व्यक्तीस याच्या घडलेल्या प्रकाराची माहिती दिली त्यानुसार सायंकाळी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संबंधित प्रकार मिटवण्यासाठी जखमी संदिप कांबळे , विजय जिरगे व मयत सचिन कांबळे यांना अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये बोलवले यावेळी आरोपी नंदकुमार बळी साठे ,अनिल विठ्ठल साठे , जितेंद्र चिंतू यादव , अशोक आदमाने ,जयदीप अनिल साठे ,रोहित दगडू साठे ,तुषार इस्राइलला साठे , आदर्श इस्राईल साठे, अनुश साठे , नोहा माने , प्रेम साठे, निलेश अनिल साठे , दिलीप गुंडा साठे , राज आनंदा साठे , रितेश मोहन साठे , सचिन विलास साठे , सौरभ भिंगारे ,राजमोहन साठे व अनोळखी चार ते पाच यांनी काठी दगड लोखंडी गच लाथा बुक्क्यांनी मारहाण कार्यास करण्यास सुरुवात केली या मारहाणी मध्ये सचिन बाळासो कांबळे हा बेशुद्ध पडल्याचे पाहून तात्काळ आरोपींनी तिथून पळ काढला यावेळी सचिन कांबळे यास जखमी संदीप सूर्यकांत कांबळे विजय मुरलीधर जिरगे यांनी दुचाकीवरून हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये आणले पोलिसांनी त्याची अवस्था पाहता त्यांना तात्काळ हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये पाठवले ग्रामीण रुग्णालयातून त्यांना तात्काळ इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयांमध्ये जाण्याचा सांगितले त्यानुसार ते तिथे गेले असता एक्स-रे मशीन बंद असल्याचे सांगत त्यांना कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात जाण्यास सांगितले यावेळी उपचार सुरू असताना सचिन बाळासो कांबळे यांचा मृत्यू झाला मृत्यूची बातमी कळताच रुई गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले तसेच सीपीआर रुग्णालयाच्या बाहेर मयत सचिन बाळासो कांबळे याच्या नातेवाईकांनी गर्दी करत आरोपींना तात्काळ अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतल्याने सीपीआर परिसरामध्येही तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले तात्काळ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रुग्णालयाबाहेर चौक बंदोबस्त तैनात केला याची फिर्याद हातकणंगले पोलिसांमध्ये संदीप सूर्यकांत कांबळे यांनी दिली असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर डॉ रोहिणी सोळंके करत आहेत.