Home कोल्हापूर जिल्हा मनुष्य जीवनात संतांचा सहवास असणे गरजेचे-कबिर महाराज पंढरपूर 

मनुष्य जीवनात संतांचा सहवास असणे गरजेचे-कबिर महाराज पंढरपूर 

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

मनुष्य जीवनात संतांचा सहवास असणे गरजेचे-कबिर महाराज पंढरपूर

 

 

कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):- मनुष्य जीवनात जगत असताना कर्म धर्म यांना समान न्याय देणे गरजेचे असून आज भौगोलिक मिळणाऱ्या सुखा मुळे मनुष्य आपली धार्मिकता व सुसंस्कृतपणा विसरत चालला आहे. परिणामी यामुळे मनुष्य जीवनात अनेक तोटे होत असून मनुष्याने आपल्या दिलेल्या शरीर रचनेचा व दिलेल्या बुद्धीचा योग्य वापर केल्यास स्वतःबरोबर समाज व समाजाबरोबर गावाची नक्कीच प्रगती साधता येईल, त्यासाठी धार्मिकतेची ओढ संतांचा सहवास असणे गरजेचे आहे .असे गौरव उद्गार कबीर महाराज( पंढरपूर )यांनी काढले

Advertisements

ते कुंभोज तालुका हातकणंगले येथे कुंडले महाराज चरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित सात दिवसीय हरिनाम सप्ताह काल्याच्या किर्तन प्रसंगी बोलत होते. श्रावण महिन्यात कुडले महाराज ट्रस्ट व विठ्ठल मंदिर येथे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर धार्मिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिला व मुलींचा सहभाग होता. सायंकाळी संपूर्ण कुंभोज परिसरातून दिंडी पालखीचे आयोजन करण्यात आले होते तर आज सकाळी 11 वाजता काल्याच्या किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदर मंदिराचे शिवाजी कुंडले महाराज तसेच मठातील अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर विठ्ठल मंदिरत चालू असणाऱ्या सतत धार्मिक कार्यक्रमामुळे कुंभोज सह परिसराला एक धार्मिक रूप आले असून, महिला वर्गाबरोबरच तरुण वर्गालाही धार्मिकतेची ओढ लागत असल्याचे चित्र दिसत आहे. सदर काल्याच्या किर्तनप्रसंगी गावातील अनेक माळकरी संप्रदायातील महिला व पुरुष तसेच गावातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सदर हरिनाम सप्ताहास विद्यमान आमदार राजू बाबा आवळे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, विद्यमान सरपंच सौ स्मिता चौगुले महाविकास गटनेते किरण माळी ,जवाहर कारखान्याचे संचालक बाबासाहेब चौगुले आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements