जनसुराज्य शक्ती पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभेला संधी देणार-आ.विनय कोरे
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-आसगाव (ता.पन्हाळा) येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने करवीर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
महाराष्ट्र राज्यात महायुतीमध्ये सहभागी असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी,हातकणंगले,करवीर व चंदगड या चार तर सांगली जिल्ह्यातील मिरज व जत या दोन जागांची मागणी केली आहे. तसेच सोलापूर,नांदेड,परभणी या जिल्ह्यातही जनसुराज्य शक्ती पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभेला संधी देणार असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे यांनी सांगितले.
करवीरमधून निवडणूक लढविण्यासाठी संताजी बाबा घोरपडे यांनी पूर्वतयारी केली आहे. या मतदारसंघात पश्चिम पन्हाळा आणि गगनबावड्यातील सुमारे १०१ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात जनसुराज्य शक्तीचा सक्षम गट आहे.करवीर विधानसभा मतदारसंघातून व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी बाबा घोरपडे यांची जनसुराज्य शक्ती पक्षातून आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी उमेदवारी जाहीर केली..
यावेळी जनसुराज्य शक्तीचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,वारणा दूध संघाचे व्हा.चेअरमन एच.आर.जाधव (आण्णा),कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई,कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक पाडुरंग काशीद,युवराज बेलेकर,हंबीरराव चौगले – मरळी,भाऊसो डबिरे – कळे,सर्जेराव पाटील,संजय पाटील,एकनाथ पाटील,कुमार नकाते,अमर देसाई,अमर पाटील,सरदार पाटील – पंणुद्रे,पोपट पाटील – माजगाव,आण्णासो चौगुले – हरपवडे…*
*आसगाव सरपंच मानसिंग भोसले,सरदार पाटील,नामदेव देसाई – घरपण,संभाजी कापडे – सावर्डे,सतिश पाटील – बाजारभोगाव,स्नेहदिप पाटील – कसबा ठाणे,पुनाळ सरपंच युवराज पाटील,मच्छिंद्र पाटील – सुळे,गोविंद चौगुले – पणुरे,आण्णा ठाणेकर – तांदुळवाडी,परखंदळे सरपंच उमेश देसाई,शिवाजी पवार,सरदार पाटील – सावर्डे,बाळू पाटील – कोलिक,शोभाताई पाटील – वाळोली,गोठे सरपंच दिपाली पाटील,शिवाजी पाटील,वाळवेकरवाडी सरपंच सरदार वाळवेकर,बाबुराव मोळे – घरपण,आनंदराव जाधव – वाघुर्डे,राऊ पाटील – गोगवे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..