वीराचार्य ॲड. बाबासाहेब कुचनुरे पुण्यतिथी सोहळा संपन्न 

    वीराचार्य अँड. बाबासाहेब कुचनुरे पुण्यतिथी सोहळा संपन्न

     

     

    कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-विद्यासन्मतीदास पावन वर्षायोग (चातुर्मास)- सन 2024 निमित्त श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, गल्ली नं. ४, जयसिंगपूर येथे आयोजित केलेला गुरूदेव समंतभद्र महाराज व स्व. वीराचार्य अॅड. बाबासाहेब कुचनुरे भव्य पुण्यतिथी सोहळा आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तसेच युवासम्राट, संतवात्सल्यनिधी पः पू. १०८ आचार्यश्री चंद्रप्रभसागरजी महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले.*

    यावेळी आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, प्रतीक पाटील, भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील, जयश्री मदन पाटील, सावकार मादनाईक, उत्तम पाटील बोरगाव, संजय पाटील यड्रावकर, अनिल बागणे, सागर चौगुले, विनोदिनी शिखरे, स्वरुपा यड्रावकर यांच्यासह श्रावक श्राविका उपस्थित होते.