Home कोल्हापूर जिल्हा कुंभोज प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्रात ध्वजारोहण संपन्न

कुंभोज प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्रात ध्वजारोहण संपन्न

Advertisements

कुंभोज प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्रात ध्वजारोहण संपन्न

Advertisements

 

 

कुंभोज, प्रतिनिधी(विनोद शिंगे) : – भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक महान हुतात्म्याने सैनिकांनी आपल्या जीवाची बलिदान दिले, परिणामी काही लोकांनी स्वतःच्या विचाराने भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न केले. अशा महान हुतात्म्यांना व सैनिकांना अभिवादन करत असताना खऱ्या अर्थाने भारतीय असल्याचा अभिमान वाटतो असे गौरव उद्गार प्रजापिता ब्रह्माकुमारी पाठशाला केंद्र कुंभोज च्या प्रमुख शिल्पा बहिणजी यांनी प्रबोधनपर प्रवचन करताना सांगितले.

आज 15 ऑगस्ट भारत स्वातंत्र्य दिनाच्या78 व्या वर्षानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शिंगे वाडा येथे ध्वजारोहण माजी शिक्षक अण्णासाहेब आरगे व उपस्थित असणाऱ्या सर्व बहिणजीच्या वतीने करण्यात आले. यावेळी परमपिता शिवबाबा यांनी सांगितलेली आचार विचार जगाला तारणारे असून आज त्यांचाच प्रचार प्रजापिता ब्रह्माकुमारी शाखेच्यावतीने केला जात असून त्यासाठी कुंभोज परिसरातील नागरिकांचे चांगले सहकार्य लाभत असल्याचे मत श्वेता भहनजी यांनी बोलताना व्यक्त केले. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या सर्व कुंभोज परिसरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या प्रमाणा ब्रह्मकुमारी केंद्रातील भाई व बहन जी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements