निलेवाडी गावाला महापुराचा विळखा
नवे पारगाव: निलेवाडी चा तिने बाजूने संपर्क तुटला गेले काही दिवस संतधारात सुरू असलेल्या पावसामुळे निलेवाडी तालुका हातकणंगले येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पुराची वाटचाल हळूहळू महापूराकडे सुरू आहे परंतु काल पावसाने उघडीप दिल्यामुळे पाण्याची वाढ थांबेल असं अंदाज असं होता पण तरीसुद्धा पाण्याची वाढ न थांबता पाण्यामध्ये रात्रीत किमान दीड फुटाणे वाढ झाल्यामुळे पाण्याने धोका पातळी ओलांडली आहे .निलेवाडीला संपर्क साठी तीन मार्ग असून
ऐतवडे खुर्द – तसेच अमृत नगर – निलेवाडी हे दोन्ही मार्ग पूर्वीच बंद झालेले आहेत .फक्त पारगाव निलेवाडी मार्ग सुरू होता परंतु रात्रीच त्या मार्गावर पाणी आल्यामुळे तो मार्ग सुद्धा वाहतुकीसाठी बंद झालेला आहे आणि निलेवाडी ला पूर्णपणे बेटाचे स्वरूप प्राप्त झालेला आहे अद्याप लोकांचे कोणतेही जीवत अथवा स्थावर नुकसान झाले नसली तरी सुद्धा शेती पिकामध्ये मात्र भरपूर प्रमाणात पाणी आल्यामुळे भुईमूग सोयाबीन भात ही पिके कुजण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्याचबरोबर नदीकाठच्या मळीच्या शेत संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे जनावरांचा फार चाऱ्याचा प्रश्न सुद्धा गंभीर होणार आहे.