कोल्हापूर जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी जाहीर
पेठवडगांव,प्रतिनिधी :-भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्व सुचनेनुसार दि 26 जुलै व 27 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे जिल्यातील सर्व नद्या धोका पातळीतुन वाहत आहेत त्या मुळे ग्रामीण भागात पाणी येत आहे याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे या सर्व बाबींचे अवलोकन करता कोल्हापूर जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील शाळांना दोन दिवस 26 व 27 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
पंचगंगेने धोका पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
या दोन दिवसाच्या कालावधीत मुख्याध्यापक,शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मात्र शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज पहावे असे शेवटी म्हंटले आहे.