Home कृषी कवठेसार येथे चारा प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक  

कवठेसार येथे चारा प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक  

कवठेसार येथे चारा प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक

 

 

 

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असणाऱ्या शरद कृषी महाविद्यालय, जैनापूर येथील ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगीक कार्यक्रमांतर्गत कवठेसार येथे कृषीकन्या ऋतुजा चौगुले, राजनंदिनी हिरुगडे, सानिका पाटील, उत्कर्षा पाटील, वैष्णवी संकपाळ, शितल ठिकणे यांनी शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार करता जनावरांना पोषण आहारासाठी तसेच दूध उत्पादन वाढण्यासाठी योग्य प्रमाणात चारा प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यासाठी शरद कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या एस. आर. कोळी, उपप्राचार्य एस. एच. फलके, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. टी. कोळी तसेच पशुसंवर्धन व दुग्धशात्र विभागाचे प्रा. जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.