Home Breaking News शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यातील हक्काची एकही जागा सोडणार नाही- आम.भास्कर जाधव

शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यातील हक्काची एकही जागा सोडणार नाही- आम.भास्कर जाधव

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यातील हक्काची एकही जागा सोडणार नाही- आम.भास्कर जाधव

 

 

हातकणंगले,प्रतिनिधी( विनोद शिंगे):-मागील विधानसभेवेळी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 6 आमदार होते पण घरचा भेदी असणाऱ्या भाजपाने आपल्या शिवसेनेच्या म्हणजेच युतीच्या उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवार उभे करून त्याला मदत केली व आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे काम केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी इतर पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. सद्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी होणार असली तरी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या हक्काची एकही जागा सोडणार नाही असे स्पष्ट मत शिवसेना नेते तथा पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते, आमदार भास्करराव जाधव यांनी व्यक्त केले. ते शिरोली ता.हातकणंगले येथे आयोजित पदाधिकारी व शिवसैनिकांच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते.

Advertisements

दरम्यान महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, शाहूवाडी-पन्हाळा, राधानगरी, कागल विधानसभा या जागेवर आमचा दावा असणार आहेच, त्याचबरोबर हातकणंगले विधानसभा हा मतदार संघ जरी काँग्रेसला सुटणार असला तरी त्यांच्याशी योग्य ती चर्चा करून याठिकाणी १० वर्षे हातकणंगलेचे प्रतिनिधित्व केलेले शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मेळाव्यास शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे कोल्हापूर संपर्क प्रमुख अरूणभाई दुधवडकर, उपनेते संजय पवार, सह संपर्क प्रमुख हाजी अस्लम सय्यद, संघटक चंगेजभाई पठाण, मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर, मा.आमदार सत्यजित पाटील, हातकणंगले विधानसभा संपर्क प्रमुख प्रविण देसाई, शाहूवाडी विधानसभा संपर्क प्रमुख आनंदा भेडसे, युवासेना विस्तारक डॉ. सतिश नरसिंग, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, उप जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, साताप्पा भवान, मा. जिल्हा परिषद सदस्य प्रविण यादव, मा. पंचायत समिती सदस्य पिंटू मुरूमकर, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल भंडारी, महिला आघाडीच्या उषाताई चौगुले, पूनम भोसले, चंद्रभागा चौगुले तसेच हातकणंगले व शाहूवाडी विधानसभा मतदार संघातील तालुका प्रमुख, उप तालुका प्रमुख, विभागप्रमुख, शहर प्रमुख, शाखाप्रमुख त्याचबरोबर महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements