Home कोल्हापूर जिल्हा राजर्षि शाहूंचा श्रमिकांच्या कल्याणाचा वसा आम्ही पुढे चालवित आहोत: सौ निर्मला कुराडे

राजर्षि शाहूंचा श्रमिकांच्या कल्याणाचा वसा आम्ही पुढे चालवित आहोत: सौ निर्मला कुराडे

राजर्षि शाहूंचा श्रमिकांच्या कल्याणाचा वसा आम्ही पुढे चालवित आहोत: सौ निर्मला कुराडे

 

 

 

कोल्हापूर-,(अविनाश शेलार यांजकडून):-लोकराजा राजर्षि शाहू महाराजांनी लोकांच्या दीन, पददलित श्रमिकांच्या उद्धारासाठी अनेक कामे केली. यावर्गाच्या कल्याणाचा हा वसा आम्ही पुढे चालवित आहोत असे विचार हॉकर्स जॉईट अॅक्शन कमिटीच्या सौ निर्मला प्रमोद कुराडे यांनी व्यक्त केले. कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप साळोखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

 

हॉकर्स जॉईंट अॅक्शन कमिटीच्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता, कमिटीचे गोवा विभागाचे संयोजक संतोष खटावकर यावेळी प्रमुख पाहुणे होते.

 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कमिटीच्या वतीने महिला सभासदांना पर्यावरण पूरक कापडी पिशव्या शिलाईच्या कामाचे वितरण करण्यात आले. याचा लाभ सध्या ५० पेक्षा अधिक महिला घेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भविष्यामध्ये या कामाबरोबरच एलईडी बल्ब्स माळा, विविध उत्पादनांची प्रदर्शने महोत्सव यासारख्या उपक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

यावेळी मीना साळुंखे आशा सावंत राधा सावंत अश्विनी इंगळे सुषमा कुन्हाडे अमित फुटाणे तेजस्विनी फुटाणे आधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सौ शैलजा पोतदार यांनी केले होते.