Home कोल्हापूर जिल्हा सातवे हायस्कूल सातवे व गर्ल्स हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम संपन्न

सातवे हायस्कूल सातवे व गर्ल्स हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम संपन्न

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

 

 

सातवे हायस्कूल सातवे व गर्ल्स हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम संपन्न

 

 

 

सा.सावर्डे,(प्रतिनिधी):- शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी”ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार”प पू.डॉ.बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित ,सातवे हायस्कूल सातवे व गर्ल्स हायस्कूल सातवे मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisements

या कार्यक्रमासाठी योगाचार्य माजी सैनिक विठ्ठल जाधव सोलापूर, मोहन मोकाशी मुख्याध्यापक बहाद्दरवाडी व रामदास निकम (नाना) योगा शिक्षक सातवे, सुनील पाटील संपादक वारणा न्यूज हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते प.पू.डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात त्यानंतर प.पू.डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शालेय परिपाठानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन माननीय मुख्याध्यापक अशोक कांबळे सर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमानिमित्त गेली 70 वर्षे योग साधना करणारे योगाचार्य तथा माजी सैनिक श्री विठ्ठल जाधव यांनी योगाचे जीवनातील महत्त्व व योग साधना याविषयी आपले मनोगत व्यक्त केले व योगाची प्रात्यक्षिके सादर केली.

श्री रामदास निकम सातवे यांनी विद्यार्थ्यांना सर्व योगाभ्यास प्रात्यक्षिकासह स्पष्ट करून दिला यामध्ये वार्मअप, पद्मासन, मयूरासन, भ्रामरी आसन, सूर्यनमस्कार व इतर आसनांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

श्री मोहन मोकाशी यांनी सर्वांगासन, हलासन व शीर्षासन ही आसने सादर करून उपस्थितांना आपल्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी श्री अशोक कांबळे सर (मुख्याध्यापक) गर्ल्स हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ चोकाककर मॅडम, प्रभारी पर्यवेक्षक एस. बी. पाटील सर ,सर्व

शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्री एस. पी. पोतदार यांनी मानले तर सूत्रसंचालन  सूर्यकांत चांदणे यांनी केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements