युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निम्मित बॉडी बिल्डिंग स्पर्धा उत्साहात
आजरा,(प्रतिनिधी):- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निम्मित आजरा तालुका शिवसेना युवसेना व कोल्हापूर जिल्हा अमुयचेर बॉडी बिल्डिंग असोसिएशन च्या वतीने जिल्हा स्तरीय व आजरा, चंदगड व गडहिंग्लज विभाग बॉडी बिल्डिंग स्पर्धा दूरदुडेश्वर हॉल आजरा येथे संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या हस्ते व बॉडी बिल्डिंग असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष डॉ. रविंद्र मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील ,तालुका प्रमुख युवराज पोवार, प्रभाकर कोरवी, संजय धुरे ,ओमकार मद्यालकर, मोसीन पटेकरी, कृष्णा पाटील, महेशपाटील, राजकुमार भोगण, हरिषचन्द्र व्हरकट , सलीम लतीफ उपस्थित होते या स्पर्धेचे मानकरी आदित्य ठाकरे श्री 2024 चे विशाल गावडे ठरले विभागीय मानकरी प्रशांत केबळे व गटातील विजेते धीरज साळोखे, संकेत दादाघोळ, अनिकेत मंडलिक, गौतम कुचुकेरी, अभिषेक सोनूले, विष्णू नायर ,हे ठरले तर पंच म्हणून गणेश सकट, सिकंदर सोनूले, राजू कवाळे, भारत श्री नारायण माजगावकर , पापालाल पठाण, महादेव कांबळे लाभले. या स्पर्धेत 100 वर स्पर्धक सहभागी झाले होते. त्याचबरोबर मोठया संख्येने प्रेषक व मान्यवर शिवसैनिक हजर होते.
सूर्यकांत भोईटे, दिलीप माने, अजित खोत, संजय हेगडे, रमेश भंडारे आदी उपस्थित होते..