Home शैक्षणिक जिल्हा परिषद शाळांना पुन्हा सुगीचे दिवस

जिल्हा परिषद शाळांना पुन्हा सुगीचे दिवस

जिल्हा परिषद शाळांना पुन्हा सुगीचे दिवस

 

 

 

कुंभोज ,(प्रतिनिधी):-15 जून पासून संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद खाजगी व अन्य शाळा सुरू होणार असून, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली आहे .परिणामी कुंभोज सह परिसरात जिल्हा परिषदेच्या शाळांना चांगले दिवस येणार असल्याची सध्याची परिस्थिती दिसत असून, खाजगी शाळांच्या पेक्षा जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे .जिल्हा परिषद शाळांच्या मधून दिला जाणारा पोषण आहार शालेय साहित्य व जिल्हा परिषद शाळांमध्ये झालेली मोठ्या प्रमाणात सुधारणा यामुळे सध्या पालक वर्गाचा कल जिल्हा परिषद शाळांच्या कडे वाढत असून. खाजगी शाळांची वाढणारी प्रवेश फी वर्षभर असणारा खर्च यामुळे सध्या पालक मेटाकोटीला आल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी यावर्षी खाजगी शाळांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात ढासळणार असून, सर्वच पालक वर्गातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्यात विद्यार्थ्यांची पसंती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी शासनाने राबवलेल्या वेगवेगळ्या योजना पालक वर्गाच्या हृदयात उतरल्यास नक्कीच जिल्हा परिषद शाळांना चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत व पुन्हा एकदा पूर्वीच्या परंपरेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळा भरून अओसडू लागतील असा विश्वास शिक्षक व पालक वर्गातून व्यक्त केला जात आहे. परिणामी जिल्हा परिषदेतील शाळेतल्या शिक्षकांच्यावर शासन लादत असलेल्या अन्य कामांचा बोजा कमी झाल्यास जिल्हा परिषद च्या शाळा नक्कीच अग्रगण्य ठरतील असा विश्वासही पालक वर्गातून व्यक्त होत आहे. विनोद शिंगे कुंभोज.