Home Breaking News महेंद्र शिंदे यांचे काम कौतुकास्पद – डॉ.अशोकराव माने

महेंद्र शिंदे यांचे काम कौतुकास्पद – डॉ.अशोकराव माने

Advertisements

महेंद्र शिंदे यांचे काम कौतुकास्पद – डॉ.अशोकराव माने ,वठार येथे संजय गांधी योजनेचे आदेश वाटप

Advertisements

 

 

नवे पारगाव : वाठर ता. हातकणंगले येथे संजय गांधी निराधार योजना शिबिरातील लाभार्थ्यांना अनुदान आदेश वाटप करण्यात आले यावेळी डॉ.अशोकराव माने (बापू) सदस्य कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती यांच्या शुभहस्ते आदेशाचे वाटप झाले. यावेळी बोलताना माने म्हणाले की संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य पदाच्या माध्यमातून महेंद्र शिंदे यांचे काम अतिशय कौतुकास्पद आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा महेंद्र शिंदे (चेअरमन ) सदस्य हातकणंगले संजय गांधी निराधार अनुदान योजना हे होते यावेळी शिंदे म्हणाले भविष्यकाळात तालुक्यात मंडळ स्तरावर शिबिर घेऊन सर्वसामान्य व गरजू लोकांना निराधार योजनेचा जास्तीत जास्त लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.

यावेळी सर्कल अमित लाडसो, तलाठी आझाद मोमीन, उपसरपंच गजेंद्र माळी, सदस्य सागर कांबळे , सदस्या रेश्मा शिंदे, अश्विनी कुंभार, रुकसाना नदाफ, राजहंस भुजिंगे ,सुरज नदाफ, रमेश गायकवाड , प्रज्योत पाटील ,राजेंद्र पाटील, दगडू कोरवी, बाजीराव शिंदे, दत्तात्रय शिंदे, महादेव शिंदे, सुजाता शिंदे, वैशाली शिंदे ,राजेंद्र शिर्के, बाबासाहेब पाटील, विनोद पाटील, गोविंद शिंदे, हानिफ पोवाळे बाबासाहेब सुतार यांचेसह  वाठार येथील 36 लाभार्थी उपस्थित होते. तसेच निलेवाडी येथील पाच आदेश वाटप केले यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ, तरूण मंडळाचे कार्यकर्ते, सर्व गावातील प्रमुख, संस्थाचे चेअरमन,व्हा चेअरमन सर्व संचालक, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य,सदस्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्व कार्यकर्ते,जय हनुमान युवा शक्ती चे कार्यकर्ते उपस्थित होते.आभार सुशिल जिवरस्कर यांनी माानले

Advertisements
Advertisements