Home शैक्षणिक श्री निनाई कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

श्री निनाई कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

श्री निनाई कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान ,

सन्मानपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान

 

दुधगाव : येथील श्री निनाई कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट येते माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ श्रीफळ व एम एस सी आय टीचे सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एमकेसीएलचे राजेंद्र साळुंखे सर व संस्थेचे मार्गदर्शक प्रकाश पाटील सर उपस्थितीत होते येतील शासनमान्य एमकेसीएल मान्यता प्राप्त अधिकृत सेंटर असून भविष्यातील तंत्रज्ञानाच्या युगातील संगणकीय ज्ञानाची गरज, स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक कॉम्प्युटर टायपिंग कौशल्य, एम एस सी आय टी, टॅली प्राईम सारखे कार्यालयीन कोर्सेस अध्ययनासाठी उपयुक्त मूलभूत संगणक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, विविध बौद्धिक स्पर्धा, व्यक्तिमत्व विशेष कार्यक्रम राबवणारी १० वर्षांची शैक्षणिक परंपरा असणारी दुधगाव व परिसरातील एकमेव अधिकृत संस्था आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व्हावे व त्याची प्रेरणा इतर विद्यार्थ्यांनाही मिळावी या हेतूने हा सन्मान सोहळा प्रत्येक वर्षी आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमा प्रसंगी राजेंद्र साळुंके यांनी एमकेसीएल मार्फत उपलब्ध असणाऱ्या विविध कोर्स ची विद्यार्थ्यांना माहिती देऊन पुढील वाटचालीस शभेच्छा दिल्या संस्थेचे मार्गदर्शक प्रकाश पाटील यांनी भविष्यातील एआय तंत्रज्ञान याचा शैक्षणिक क्षेत्रात कशा पद्धतीने उपयोग होतो याची माहिती सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या विद्यासागर पाटील व प्राथमिक शिक्षक अजित कांबळे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मोईन शिकलगार यांनी शिक्षण क्षेत्रातील भविष्यातील संधी आणि पर्याय या विषयावर मार्गदर्शन केले. तेजस्विनी आवटी, सोनाली पाटील या माजी विद्यार्थिंनींही त्यांचे अनुभव उलगडले. या कार्यक्रमाप्रसंगी सुरज सनदे हे उपस्थितीत होते. तसेच परिसरातील विद्यार्थी, पालक यांचा उस्फुर्त प्रतिसाद मोठ्या संख्येने लाभला. संस्थेचे संस्थापक विनोद पाटील यांनी आभार मानले व सागर रावळ यांनी निवेदन केले.