कुंभोज पश्चिम विभागातील शेतकऱ्यांचा वाली कोण?
शेतीपंपाची वेळापत्रक ढासळले-मनोज वाईकर
कुंभोज ,प्रतिनिधी( विनोद शिंगे):- कुंभोज गावातील सौर ऊर्जा प्रकल्प चालू झाले नंतर कुंभोज गावातील सर्व शेतकऱ्यांना नेहमी आठ तास दिवस पाळीत शेतीपंपा करिता शेतकऱ्यांना लाईट मिळेल असे एम एस सी बी ने जाहीर केले होते ,परंतु लाईट उपलब्धतेनुसार सर्व पंपांना एकाच वेळी लाईट देणे अशक्य झाले म्हणून एम एस ई बी ने कुंभोज पूर्व नेहमी दिवस पाळी व कुंभोज पश्चिम या भागातील शेतकऱ्यांना दिवस पाळी आणि रात्र पाळी असेच वेळापत्रक चालू ठेवले याबद्दल पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे तक्रार अगर आंदोलन वगैरे काहीही केले नाही. परंतु सध्या दिवस पाळी आणि रात्रपाळी या वेळापत्रकानुसार पश्चिम भागातील शेतकरी पाणी पाजत आहेत परंतु आज एक जून रोजी पासून एम एस सी बी ने रात्रपाळी आणि दिवस पाळीचे वेळापत्रक जाहीर केले त्यानुसार रात्रपाळी करता रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेत लाईट राहील असे जाहीर झाले व एम एस ई बी ते अमलात आणत आहे. परंतु आमच्या पश्चिम भागातील सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी आहे आम्हाला रात्रपाळी दिवस पाळी चालेल परंतु या वेळापत्रकामध्ये थोडासा बदल करून मिनिमम रात्रपाळीमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत शेतीपंपाकरता विद्युत पुरवठा चालू ठेवावा अशी विनंती. आता सात तारखेपासून पावसाळा चालू होत आहे व रात्र पाळी मध्ये शेतकऱ्यांना पूर्ण रात्र पावसामध्ये काढावी लागणार आहे ज्या शेतकऱ्यांची एक दोन एकर किंवा कमी जमीन आहे त्याही शेतकऱ्यांना पर्यायाने रात्रभर जागावे लागणार आहे. जर हेच वेळापत्रक आठ तास ठेवून सकाळी नऊ पर्यंत विद्युत पुरवठा चालू राहिला तर बिचाऱ्या शेतकऱ्याला रात्रभर पावसात भिजत अंधाऱ्या रात्री काम करावे लागणार नाही याचा सविनय विचार करून आम्हा शेतकऱ्यांना रात्रपाळी मधील आठ तासांमध्ये मिनिमम चार तास दिवसा उजेडी मिळावे ही विनंती. याकरिता शेतकरी संघटना गावातील प्रतिष्ठित शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून एम एस सी बी सी बोलून या गोष्टीचा पाठपुरावा करून आम्हा शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करावी एवढी विनंती.
एक अल्पभूधारक शेतकरी-मनोज वाईकर.